Oscar 2022 | ऑस्कर पुरस्कारामध्ये ड्युनने लगावला सिक्सर; पाहा संपूर्ण यादी

Oscar 2022 | ऑस्कर पुरस्कारामध्ये ड्युनने लगावला सिक्सर; पाहा संपूर्ण यादी
ऑस्कर अवॉर्ड 2022

कॅलिफोर्नियामधील लॉस एन्जेलिस (Los Angeles in California) येथील डॉल्बी थिएटरमध्ये (Dolby Theater) 94 वा अकादमी पुरस्कार सोहळा पार पडत आहे. चित्रपटसृष्टीतील सन्मान समजला जाणारा ऑस्कर पुरस्कार (Oscar 2022) सोहळ्याकडे सिनेप्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. 94 व्या अकादमी पुरस्कारांना रविवारपासून सुरुवात झाली आहे. डॉल्बी थिएटरमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. तसेच यावर्षी Regina Hall, Amy Schumer, Wanda Skyes ऑस्कर अवॉर्डमध्ये हे तीन सेलिब्रेटी होस्ट करणार आहेत.

पहिला पुरस्कार हा बेस्ट साऊंट कॅटेगिरीसाठी दिला आहे. त्याचप्रमाणे डेनिस विलेन्यूव्ह यांच्या सायन्स फिक्शन या सिनेमालाही पुरस्कार मिळाला आहे. चित्रपटामधील व्हिज्युअल आणि सिनेमॅटोग्राफी कॅटेगिरीसाठी पुरस्कार देऊन गौरव केला आहे. प्रेक्षकांना हा सोहळा सोमवारी 28 मार्चला डिस्ने प्लस हॉटस्टारवर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच ऑस्कर विजेत्यांची यादी जाणून घेऊ या.

कॅलफोर्नियामधील लॉस एंजेल येथील डॉल्बी थिएटरमध्ये 94 वा अकादमी पुरस्कारांना सोहळ्यामध्ये ड्युनने (Dune) श्रेणींमध्ये 6 पुरस्कार पटकावले आहेत. बेस्ट फिल्म एडिटिंग, बेस्ट ओरिजनल स्कोअर, बेस्ट प्रॉडक्शन डिझाईन, बेस्ट साऊंड, बेस्ट व्हिज्युअल इफेक्ट्स, बेस्ट सिनेमॅटोग्राफी या सहा श्रेणीमध्ये ड्युन या चित्रपटाने सिक्सर लगावला आहे.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – सहाय्यक भूमिका
जेसी बकले – द लॉस्ट डॉटर
एरियाना डे बोसे – वेस्ट साइड स्टोरी- विजेता
जूडी डेंच – बेलफास्ट
किर्स्टन डंस्ट – द पॉवर ऑफ द डॉग
आंजन्यू एलिस – किंग रिचर्ड

बेस्ट मेकअप आणि हेयर स्टायलिंक
कमिंग टू अमेरिका
क्रूएला
ड्यून
द आई ऑफ टेमी फेय – विजेता
हाउस ऑफ गुची

सर्वोत्तम सिनेमॅटोग्राफी
ड्यून – विजेता
नाइटमेयर एली
द पॉवर ऑफ द डॉग
द ट्रेजेडी ऑफ मैकबेथ
वेस्ट साईड स्टोरी

सर्वोत्तम ऑरिजिनल स्कोअर
इमेज-8
निकोलस ब्रिटेल – डोंट लुक अप टू
हैंस जिम्मर – ड्यून
जर्मेन फ्रेंको – एन्कॅंटो
अल्बर्टो इग्लेसियस – पॅरेलल मदर्स
जॉनी ग्रीनवुड – द पॉवर ऑफ द डॉग

सर्वोत्तम विज्युअल इफेक्ट
ड्यून
फ्री गाई
नो टाइम टू डाई
शां-ची
स्पाइडर मैन- नो वे होम

सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फीचर चित्रपट
एन्कँटो
द मिशेल Vs द मशीन्स
फ्ली (Flee)
लूका (Luca)
राया एंड द लास्ट ड्रॅगन