सेंट्रल सेनेगलमध्ये दोन बसचा भीषण अपघात; सुमारे 40 जणांचा मृत्यू, 78 जखमी

सेंट्रल सेनेगलमध्ये दोन बसच्या भीषण अपघातात 40 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काफरिन भागातील गनीबी गावात रविवारी पहाटे 3:30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला असून, या अपघातात तब्ब्ल 78 जण जखमी झाले आहेत.

सेंट्रल सेनेगलमध्ये दोन बसच्या भीषण अपघातात 40 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काफरिन भागातील गनीबी गावात रविवारी पहाटे 3:30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला असून, या अपघातात तब्ब्ल 78 जण जखमी झाले आहेत. (other 2 buses collide head on in central Senegal)

या अपघाताबाबत राष्ट्रपती मॅकी सॉल यांनी माहिती दिली. तसेच, “आज गनीबी येथे झालेल्या भीषण रस्ता अपघातामुळे मला खूप दु:ख झाले आहे, ज्यात 40 लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. मी पीडितांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त करतो आणि जखमींना लवकरात लवकर बरे व्हावे अशी मी प्रार्थना करतो”, असेही त्यांनी सांगितले.

तीन दिवसांचा दुखवटा जाहीर

या अपघाताच्या पार्श्वभूमीवर तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केल्याचे राष्ट्रपती मॅकी सॉल यांनी सांगितले. रस्ता सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा अपघात राष्ट्रीय मार्ग क्रमांक-1 वर झाला. दरम्यान, टायर पंक्चर झाल्यामुळे सार्वजनिक बस दुसऱ्या बसला धडकली. त्यामुळे बस उलटली. या अपघातात 78 जण जखमी झाले असून त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

2017 मध्येही एक भीषण रस्ता अपघात झाला होता

खराब रस्ते, खराब कार आणि चालक नियमांचे पालन न केल्यामुळे पश्चिम आफ्रिकन देशात अपघात नियमितपणे होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. 2017 मध्ये दोन बसच्या अपघातात किमान 25 जणांचा मृत्यू झाला होता.


हेही वाचा – जगातील सर्वात लांब ‘एमव्ही गंगाविलास’ रिव्हर क्रूझचा शुक्रवारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते शुभारंभ