घरदेश-विदेशक्युबा ऑईल डेपोवर वीज कोसळून भीषण आग; 1 ठार ,121 जखमी, अनेक...

क्युबा ऑईल डेपोवर वीज कोसळून भीषण आग; 1 ठार ,121 जखमी, अनेक लोक बेपत्ता

Subscribe

या आगीने काही वेळातच दौद्र रुप धारण केले आणि आजूबाजूचा परिसरही आगीच्या भक्ष्यस्थानी आला आहे.

क्युबाच्या मातान्झास शहरात ऑईल डेपोवर वीज कोसळून भीषण आगीची घटना घडली आहे. या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर 121 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे, दरम्यान यात 17 अग्निशमन दलाचे कर्मचारी बेपत्ता झाले आहेत. ही घटना शनिवारी (6 ऑगस्ट) मतांझास शहरात (Matanzas City) ‘मतांझास सुपरटँकर बेस’मध्ये घडली. वीज पडल्यानंतर किमान चार स्फोटांचे आवाज ऐकू आले. यानंतर आगीच्या टँकरवर आग पसरली, अद्यापही या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

क्युबाच्या उर्जा आणि खाण मंत्रालयाच्या माहितीनुसार, शुक्रवारी (५ ऑगस्ट) वादळीवाऱ्यानंतर मतांझास शहरातील इंधन साठा असणाऱ्या मतांझास सुपरटँकर बेसवर वीज कोसळली. यामुळे इंधन टँकरला आग लागली. या आगीने काही वेळातच दौद्र रुप धारण केले आणि आजूबाजूचा परिसरही आगीच्या भक्ष्यस्थानी आला. ही आग नंतर इतर टँकरवर पसरली. आग विझवण्यासाठी लष्करी हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले होते. हेलिकॉप्टरच्या साहाय्याने पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न होत आहे. तर आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान तासंतास झगडत होते.

- Advertisement -

दरम्यान क्युबा सरकारने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय मदतीचे आवाहन केले आहे. यानंतर मेक्सिको आणि व्हेनेझुएलाने आग विझवण्यासाठी अनेक अग्निशमन पथकं पाठवली, तर अमेरिकेनेही तांत्रिक सल्ला दिला आहे. मित्र देशांच्या या मदतीमुळे आग आटोक्यात आण्यासह जीवितहानी कमी करता येईल, अशी आशा व्यक्त होतेय.

क्युबन अधिकार्‍यांनी सांगितले की, दुसऱ्या स्फोटात किमान 121 लोक जखमी झाले, त्यापैकी 36 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, यातील पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. त्याचवेळी 1,000 हून अधिक नागरिकांना या परिसरातून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले आहे.

- Advertisement -

क्युबाचे राष्ट्राध्यक्ष मिगुएल डायझ कॅनेल यांनी या संपूर्ण घटनेची माहिती दिली. आम्ही मेक्सिको, व्हेनेझुएला, रशिया, चिली या सरकारचे मनापासून आभार व्यक्त करतो, ज्यांनी या कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी आम्हाला त्वरित मदत देऊ केली. तसेच या संकटात अमेरिकेने तांत्रिक सल्ला देण्याचे कामही केले आहे. असे ट्विट त्यांनी केले आहे. मात्र क्युबा शहर इंधनाच्या भीषण संकटातून जात असताना ही दुर्घटना घडली आहे. क्युबातील नागरिक दररोज ब्लॅकआउट आणि इंधन टंचाईशी झुंज देत आहे. अशात इंधन आणि साठवण क्षमता कमी झाल्याने परिस्थिती आता बिघडू शकते.


हेही वाचा : ISRO कडून देशाच्या सर्वात छोट्या उपग्रहाचे आज प्रक्षेपण


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -