घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटCoronaVirus: कोरोनावरील उपाय करण्याबाबत WHOने युरोपियन देशांना केले आवाहन

CoronaVirus: कोरोनावरील उपाय करण्याबाबत WHOने युरोपियन देशांना केले आवाहन

Subscribe

सोमवारी जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेड्रोस एॅधानॉम घेबरेयेसस यांनी सांगितले की, युरोपीय देशांनी कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवणारे उपाय सोपे करावेत. त्यासाठी सर्व संक्रमित व्यक्तींना शोधून काढणे. त्यांना वेगळे ठेवणे, त्यांची चाचणी करणे आणि उपचार करणे आवश्यक आहे.

- Advertisement -

जागतिक आरोग्य संघटनेने एका पत्रकार परिषदेत म्हटले की, युरोपमध्ये लॉकडाऊन दरम्यान कोरोनाच्या नवे रुग्ण मिळण्याच्या संख्येत घट होताना दिसत आहेत. आम्ही सर्व देशांना कोरोनाचे संक्रमितांची ओळख पटवणे, त्यांना वेगळे ठेवणे, चाचणी करणे आणि प्रत्येक संपर्कात आलेल्या व्यक्तीचा शोध घेण्याचा आग्रह करत आहोत. जेणेकरून नवीन रुग्ण मिळण्याच्या संख्येत घट कमी होईल.

घेबरेयेसस म्हणाले की, हा जीवघेण्या व्हायरस असून घरी राहण्याच्या दिलेल्या सूचनेमुळे आणि सोशल डिस्टन्सिंगमुळे अनेक देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे.

- Advertisement -

जगातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या कोरोना व्हायरसमुळे बळी पडण्याची शक्यता आहे. नंतर घेबरेयेसस यांनी ट्विट करून लिहिले की, या कोरोनावर मात करण्यासाठी राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर एकत्र येऊन आरोग्य व्यवस्था बळकट करणे आवश्यक आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, सोमवारपर्यंत युरोपमध्ये एकूण १ लाख ३४ हजार ८५२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. तर आतापर्यंत १ लाख २२ हजार २१८ जणांचा मृत्यू झाला आहे. जागतिक स्तरावर आतापर्यंत दोन लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – Corona: जगात कोरोनाचे थैमान! ३० लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण, मृतांचा आकडा २ लाख पार!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -