घरदेश-विदेशPakistan PM on Economy: होय! पाकिस्तान कंगाल; देश चालवण्यासाठी पैसे नसल्याची इम्रान...

Pakistan PM on Economy: होय! पाकिस्तान कंगाल; देश चालवण्यासाठी पैसे नसल्याची इम्रान खान यांची कबुली

Subscribe

पाकिस्तानकडे आता देश चालवण्यासाठी पैसे नसल्याचे खुद्द पाकिस्तानाचे पंतप्रधान इम्नान खान यांनी सांगितले आहे. यामुळे सध्या पाकिस्तान इतर देशाकडून पैशाची मागणी करत आहे. पाकिस्तान फेडरल बोर्ड ऑफ रिवेन्यूचे पहिले ट्रॅक अँड ट्रेस सिस्टमचे उद्घाटन सोहळ्यात संबोधित करताना इम्रान खान म्हणाले की, देश चालवण्यासाठी पर्याप्त पैसे नसणे ही सर्वात मोठी समस्या आहे. यामुळे आता पाकिस्तानला पैसे उधार घ्यावे लागत आहे. टॅक्स कलेक्शनमध्ये कमी आणि वाढते परदेशी कर्ज हे पैशाची चणचण जाणवत असल्याचे मुख्य कारण आहे. आता पाकिस्तान सुरक्षेचा राष्ट्रीय मुद्दा बनला आहे, असे इम्रान खान म्हणाले आहेत.

पाकिस्तानमध्ये इम्रान खान याच्या नेतृत्वखाली सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे गरिबांचे दुःख आणखीन वाढू शकते. इस्लामाबादने पुनरुज्जीवन सुनिश्चित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून घेतलेले ६ अब्ज डॉलरचे बेलआऊट पॅकेज घेण्यास सहमती दर्शविली आहे. पाकिस्तानने हा पण खुलासा केला आहे की, येणाऱ्या दिवसांमध्ये देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढण्याचा अनुषंगाने दोन महिन्यांत पाऊल उचलावी लागेल.

- Advertisement -

पंतप्रधानांचे अर्थविषयक सल्लागार शौकत तारीन यांनी येणऱ्या काही महिन्यांत वीजेच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. जो सध्या प्रति युनिट अंदाजे ५० पैसे इतका आहे. मात्र, हे परिपत्रक कर्जाच्या पातळीवर ठरवले जाईल, असेही तारीन यांनी स्पष्ट केले.


हेही वाचा – RSS शाखा आणि हिंदू नेत्यांवर होऊ शकतो दहशतवादी हल्ला; IBने अलर्ट केला जारी


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -