घरताज्या घडामोडीशांतीपूर्ण मार्गाने तोडगा काढण्यास आमचा पाठिंबा - अमेरिका

शांतीपूर्ण मार्गाने तोडगा काढण्यास आमचा पाठिंबा – अमेरिका

Subscribe

सद्यस्थितीतून शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्यास त्यांनी पाठिंबा दर्शवला आहे.

भारत-चीन यांच्यात सध्या सीमावाद सुरू असून एकीकडे लष्करी स्तरावर चर्चा सुरू होती. सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू असतानाच, दुसरीकडे प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलएसी)वर गलवाण खोऱ्यात चीनने भारतीय सैनिकांवर शस्त्रांनिशी हल्ला केला. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले, तर चीनचे ४३ सैनिक ठार झाले आहेत. यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. तर, अमेरिकेकडून देखील या घटनेबाबत प्रतिक्रिया आली आहे, अशी माहिती एएनआयने दिली. दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलएसी)वर उफाळलेल्या संघर्षानंतर उद्भवलेल्या परिस्थितीकडे अमेरिकेचे बारकाईने लक्ष असल्याचे अमेरिकेकडून सांगण्यात आले आहे. तसेच, सद्यस्थितीतून शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्यास त्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. ‘एएनआय’ वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, आम्ही ‘एलएसी’वर भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. भारताचे २० जवान शहीद झाल्याचे भारतीय लष्कराकडून सांगण्यात आल्याचे आम्ही नमूद केले आहे. या शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. तर, भारत व चीन दोघांनीही तणावपूर्ण स्थिती कमी करण्याची इच्छा दर्शवली आहे.  सद्य परिस्थितीमधून शांतीपूर्ण मार्गाने तोडगा काढण्यास आमचा पाठिंबा आहे. तसेच, २ जून २०२० रोजी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवर झालेल्या संभाषणात भारत-चीन सीमा परिस्थितीवर चर्चा झाली होती, असे देखील सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

भारत-चीन सैन्याने तूर्तास माघार घेतल्याचे समजते

दोन्ही बाजूंच्या सैनिकांनी तूर्त गलवाण खोऱ्यातून माघारी घेतल्याचे समजते. भारतीय परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याने सांगितले, की गलवाण खोऱ्यातून सैन्यमाघारीचे वचन चीनने पाळले नाही. त्यांनी माघारीऐवजी फिरून येथील भूभागावर ताबा घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे संघर्ष उद्भवला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -