घरताज्या घडामोडीCorona Virus: कोरोनामुळे १ लाख ४७ हजार मुलांनी पालकांना गमावलं, बाल हक्क...

Corona Virus: कोरोनामुळे १ लाख ४७ हजार मुलांनी पालकांना गमावलं, बाल हक्क आयोगाची न्यायालयात माहिती

Subscribe

संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातलं आहे. तसेच देशात सुद्धा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. परंतु कोरोनामुळे एप्रिल २०२० पासून आतापर्यंत देशात १० हजार मुलांनी आपल्या आई-वडीलांना गमावल्याची माहिती बाल हक्क आयोगाने न्यायालयाला दिली आहे. कोरोना महामारीच्या काळात १ एप्रिल २०२० पासून १ लाख ४७ हजार मुलांनी आपल्या पालकांना गमावलं आहे. तसेच कोरोना आणि अन्य कारणांमुळे देखील पालकांचा मृत्यू झाला आहे. राज्य आणि केंद्रसाशित प्रदेशांनी बाल स्वराज्य पोर्टल-कोविड केअर वन यावर ११ जानेवारीपर्यंत अपलोड केलेल्या डेटावर ही माहिती आधारीत असल्याचं राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आगोयाने सर्वोच्च न्यायालयात म्हटलं आहे.

कोरोना महामारीदरम्यान कोणत्या वयोगटातील मुलांनी आपल्या आईवडीलांना गमावलं आहे. तसेच आई-वडील गमावलेल्या मुलांची संख्या किती आहे?, याबाबत बाल हक्क आयोगाने माहिती दिली आहे. गेल्या २१ महिन्यांमध्ये आई-वडील गमावलेल्या मुलांची संख्या १० हजार ९४ इतकी आहे. तर पालकांपैकी एकाला गमावलेल्या मुलांची संख्या १ लाख ३६ हजार ९१० इतकी आहे. त्याचप्रमाणे सोडून दिलेल्या मुलांची संख्या ४८८ एवढी आहे.

- Advertisement -

कोणत्या वयोगटातील मुलांनी गमावले आपल्या पालकांना?

४ ते ७ वर्षे – २६ हजार ८० मुलं
८ ते १३ वर्षे – ५९ हजार १० मुलं
१४ ते १५ वर्षे – २२ हजार ७६३ मुलं
१६ ते १८ वर्षे – २२ हजार ६२६ मुलं

बाल हक्क आयोगाच्या आकडेवारीनुसार, ४ ते ७ वर्षे वयोगटातील २६ हजार ८० मुलांना आपल्या पालकांना गमावलं आहे. तर ८ ते १३ वर्षे वयोगटातील ५९ हजार १० मुलांनी आपल्या पालकांना गमावलं आहे. तसेच १० ते १५ वर्षे वयोगटातील मुलांची संख्या २२ हजार ७६३ इतकी आहे. १६ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांनी गमावलेल्या पालकांची संख्या २२ हजार ६२६ इतकी आहे.

- Advertisement -

कोणत्या राज्यातील आहेत मुलं?

देशात कोरोना रूग्णांच्या संख्येत ४ ते १८ वर्षापर्यंत मुलांनी आपल्या पालकांना गमावलं आहे. यामध्ये ओडिसा, महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल , दिल्ली आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे. तर ओडिसा या राज्यातून सर्वाधिक २२ हजार ४०५ मुलांनी आपल्या पालकांना गमावलं आहे.


हेही वाचा : Collarwali Tigress : मध्य प्रदेशातील सुप्रसिद्ध कॉलरवाली वाघिणीचा मृत्यू, व्याघ्र प्रेमींमध्ये हळहळ


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -