घरदेश-विदेशभारतात मुलं दत्तक घेण्यासाठी पॉझिटिव्ह ट्रेंड

भारतात मुलं दत्तक घेण्यासाठी पॉझिटिव्ह ट्रेंड

Subscribe

तीन वर्षात १४,५०० मुलांना देशासह विदेशातूनही मिळालं पालकत्व

भारतात मुलं दत्तक घेण्यासाठी पॉझिटिव्ह ट्रेंड असल्याचे दिलासादायक चित्र नुकतंच समोर आलं आहे. गेल्या तीन वर्षात १४ हजार ५०० मुलांना देशासह विदेशातूनही पालकत्व मिळाल्याची माहिती शुक्रवारी लोकसभेत महिला आणि बालविकास मंत्रालयाने दिली. देशात २०१७ पासून १४ हजार ५०० हून अधिक मुलांना दत्तक घेण्यात आले आहे, ज्यामध्ये २ हजार ९४ मुलांना परदेशी नागरिकांनी दत्तक घेतले असल्याचा समावेश आहे, अशी माहिती शुक्रवारी महिला आणि बालविकास मंत्रालयाने दिली. महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात असे सांगितले की, सन २०१७ ते २०२१ पर्यंत देशात १२ हजार ८६७ मुलांना भारतीयांनी दत्तक घेतले. यासह २ हजार ९४ मुलांना विदेशी नागरिकांनी दत्तक घेतले.

तसेच देशात सन २०१७-२०१८ मध्ये भारतीयांनी ३ हजार २७६ मुले दत्तक घेतले तर ६५१ परदेशी नागरिकांनी दत्तक घेतल्याची माहिती समोर आली आहे. सन २०१८-२०१९ मध्ये ३ हजार ३७४ मुलांना भारतीय नागरिकांनी दत्तक घेतले होते आणि ६५३ मुलांना परदेशी नागरिकांनी दत्तक घेतले होते. यासह २०१९-२०२० या एका वर्षात ३ हजार ३७४ मुलांना भारतीयांकडून दत्तक घेण्यात आले तर या एका वर्षादरम्यान, ३९४ मुलांना परदेशी नागरिकांकडून दत्तक घेण्यात आले.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स एजेंसी (CARA) या संस्थेच्या २०१८ ते २०१९ च्या आकडेवारीनुसार, या वर्षभरात लोकांनी जवळपास ६० टक्के मुली दत्तक घेतल्या आहेत. मुलांपेक्षा मुलींना दत्तक घेण्याचे प्रमाण जास्त असल्याचेही या आकडेवारीतून समोर आले आहे. तर गेल्या दोन वर्षांत भारतात एकूण ३ हजार ३७४ मुलं दत्तक घेण्यात आली होती. यापैकी १ हजार ९७७ मुली होत्या तर १ हजार ३९७ मुलं असल्याचे सांगितले गेले आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -