घरदेश-विदेशभारतीय नागरिकत्व सोडून नागरिक 'या' देशांत होतायत स्थायिक; 48 जणांनी पाकिस्तानला केलं...

भारतीय नागरिकत्व सोडून नागरिक ‘या’ देशांत होतायत स्थायिक; 48 जणांनी पाकिस्तानला केलं जवळ

Subscribe

दरम्यान आरटीआयमध्ये गृह मंत्रालयाने सांगितले होते की, गेल्या 5 वर्षांत भारतातील 6 लाखांहून अधिक नागरिकांनी आपले नागरिकत्व सोडले आहे

गेल्या 3 वर्षांत 3.92 लाख भारतीय नागगरिकांनी भारताचे नागरिकत्व सोडून इतर देशांना जवळ केले आहे. विशेष म्हणजे भारतातील या नागरिकांनी आता विविध 120 देशांचे नागरिकत्व स्वीकारले आहे. यापैकी सर्वाधिक 1.70 लाख लोकांनी अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले आहे. अशी माहिती केंद्र सरकारने मंगळवारी लोकसभेत दिली आहे. एवढेच नाही 48 भारतीयांनी भारताचे नागरिकत्व सोडून पाकिस्तानचे नागरिकत्व जवळ केले आहे.

केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत सांगितले की, परराष्ट्र मंत्रालयाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, ज्या लोकांनी भारताचे नागरिकत्व सोडले आहे त्यांनी 120 देशांचे नागरिकत्व स्वीकारले आहे. या लोकांनी वैयक्तिक कारणांमुळे भारताचे नागरिकत्व सोडल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

तीन वर्षांत 3,92,643 लोकांनी सोडले नागरिकत्व

नित्यानंद राय यांनी लेखी उत्तरात सांगितले की 2019, 2020 आणि 2021 मध्ये 3,92,643 लोकांनी भारताचे नागरिकत्व सोडले आहे. त्यापैकी 1,70,795 लोकांनी अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले, तर 64,071 भारतील आता कॅनडाचे नागरिक बनले आहेत. याशिवाय 58,391 लोकांनी ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व घेतले आहे, 35,435 लोकांनी यूकेचे, 12131 लोकांनी इटलीचे आणि 8,882 लोकांनी न्यूझीलंडचे नागरिकत्व स्वीकारले आहे. 7,046 लोक सिंगापूर, 6,690 लोक जर्मनी, 3,754 लोक स्वीडन आणि 48 लोकांनी पाकिस्तानला जवळ केले आहे.

2021 बद्दल बोलायचे झाल्यास, गेल्या एका वर्षात 1,63,370 लोकांनी भारताचे नागरिकत्व सोडले आहे. यापैकी 78,284 भारतीयांनी अमेरिकेचे नागरिकत्व घेतले आहे, तर 23,533 लोकांनी ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व घेतले आहे. त्याचवेळी, 21,597 लोकांनी कॅनडा आणि 14,637 लोक ब्रिटनचे नागरिकत्व स्वीकारले आहे.

- Advertisement -

दरम्यान आरटीआयमध्ये गृह मंत्रालयाने सांगितले होते की, गेल्या 5 वर्षांत भारतातील 6 लाखांहून अधिक नागरिकांनी नागरिकत्व सोडले आहे. 2017 ते 2021 पर्यंत 6,08,162 लोकांनी भारताचे नागरिकत्व सोडले आहे. सरासरीबद्दल बोलायचे तर दरवर्षी 1,21,632 लोकांनी भारताचे नागरिकत्व सोडले आहे.

5 वर्षात किती लोकांनी स्वीकारले भारताचे नागरिकत्व?

गेल्या 5 वर्षात 5220 परदेशी लोकांना भारताचे नागरिकत्व स्वीकारले आहे. त्यापैकी 87 टक्के म्हणजेच 4552 पाकिस्तानातून आले आहेत. दरवर्षी सुमारे 1044 लोकांना भारताचे नागरिकत्व देण्यात आले आहे. भारतीय नागरिकत्व घेण्यात पाकिस्तान आघाडीवर आहे. पाकिस्तानातील 87 टक्के, अफगाणिस्तानच्या 8 टक्के आणि बांगलादेशातील 2 टक्के नागरिक भारताचे नागरिकत्व स्वीकारत आहे. गेल्या 5 वर्षात फक्त 2021 मध्ये 1000 हून अधिक लोकांना नागरिकत्व देण्यात आले. 2021 मध्ये एकूण 1745 लोकांना भारताचे नागरिकत्व मिळाले, त्यापैकी 1580 पाकिस्तानातून आले आहेत.


हेही वाचा : रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती, १३४ मतांनी विजयी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -