Up Assembly Elections 2022 : एक नव्हे, सहा गोळ्या मारा, ओवैसींचा योगींवर निशाणा

owaisi_and_yogi_adityanath

ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीनचे अध्यक्ष असुद्दीन ओवेसी यांनी मुस्लिम मतांच्या निमित्ताने भाजपा, सपा आणि कॉंगेसवर निशाणा साधला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, सर्वांचाच मुस्लिम मतांसाठी स्वार्थ आहे. त्यांच्या मुद्द्यांशी कोणालाही काहीही घेणं नाही. आपल्या रॅलीचा एक व्हिडिओ ट्विट करत त्यांनी म्हटल आहे की, मुस्लिमांची मतं सगळ्यांना हवी आहेत, पण मुस्लिमांच्या मुद्द्यांवर मात्र कोणालाही आवाज उठवायचा नाही. जेव्हा आम्ही आवाज उठवला, तेव्हा आमच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येतो.

ट्वीटसोबतच शेअर केलेल्या व्हिडिओत ओवेसी म्हणतात की, बाराबंकी येथे आज बरोबर एक महिना आधी माझी रॅली झाली होती.ज्यामध्ये बाराबंकी येथे एक मस्जिद शहीद केल्याची माहिती दिली होती. या प्रकरणात योगी सरकारने माझ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यावर मी म्हणालो की, मला घेऊन जा, मी सासरी (जेलमध्ये) जायलाही तयार आहे. जे करायच आहे, ते करा, एकदाच घेऊन जा. तुमच्या मनात गोळी मारायचा विचार आला, तर एक गोळी नको सहा गोळ्या मारा. करून टाका एन्काऊंटर. माझ्या मृत्यूचा फैसला तुम्ही करू शकत नाही. योगी सरकारने केस दाखल करत अजामीनपात्र गुन्हा दाखल केला. मी तर वाटच पाहतोय की कधी तुम्ही मला घेऊन जाताय. तुमच्या पाहुण्याला जावई करून घ्या. योगींनी माझ्यावर खोट बोलत असल्याचा आरोप लावला आहे.

ओवैसी यांनी कोर्टाची टिप्पणी वाचून दाखवली. ज्यामध्ये मस्जिद पाडल्याचा उल्लेख आहे. त्यानंतर ओवैसी म्हणाले की, आता सांगा मी खोट बोलतोय ? या मुद्द्यावर समाजवादी पार्टी किंवा कॉंग्रेसनेही एकही शब्द काढला नाही. त्यांना फक्त मतदानाचा स्वार्थ आहे. यांना मशीदीच्या बाबतीत काही देण घेण नाही. त्यांना मुस्लिमांच्या मुलांसाठी शाळा, त्यांचे शिक्षण याचे काही देणे घेणे नाही. त्यांना फक्त मुस्लिमांकडून मतदान हवे आहे.

गेल्या वर्षी ओवैसी यांनी बाराबांकी येते एका रॅलीत संबोधित केले होते. ज्यामध्ये त्यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यंत्री योगी यांच्यावर निशाणा साधला होता. त्यामध्ये मस्जिद पाडण्याचा मुद्दाही त्यांनी मांडला होता. या भाषणानंतरच युपी पोलिसांनी भडकाऊ भाषण केल्यासाठी ओवैसींविरोधात गुन्हा दाखल केला होता.