Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश ओवैसी यांच्या व्याह्याची हैदराबादमध्ये आत्महत्या, कौटुंबिक वादातून पाऊल उचलल्याचा संशय

ओवैसी यांच्या व्याह्याची हैदराबादमध्ये आत्महत्या, कौटुंबिक वादातून पाऊल उचलल्याचा संशय

Subscribe

हैदराबाद : एमआयएमचे अध्यक्ष आणि तेलंगणातील खासदार असदुद्दीन ओवैसी यांचे व्याही मझहरुद्दीन खान यांनी आत्महत्या केली आहे. मझहरुद्दीन खान हे 60 वर्षांचे होते आणि पेशाने डॉक्टर होते. सोमवारी मझहरुद्दीन खान यांनी सोमवारी बंजारा हिल्सस्थित आपल्या निवासस्थानी स्वत:वर गोळी झाडल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisement -

मझहरुद्दीन खान यांना सोमवारी दुपारी हैदराबादच्या जुबली हिल्स भागातील अपोलो रुग्णालयात नेण्यात आले. त्याच्या डोक्याच्या उजव्या बाजूला एक जखम होती. रुग्णालयाने तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला. रुग्णालयात नेण्यापूर्वी मझहरुद्दीन खान यांनी चार तास आधी आत्महत्या केल्याचे समजते. त्यावेळी ते घरी एकटेच होते आणि त्यांनी फोन कॉलला प्रतिसाद दिला नाही म्हणून काही नातेवाईक त्याला भेटायला गेले. तेव्हा ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले, असे सांगण्यात येते. त्यानंतर त्यांना लगेच रुग्णालयात नेण्यात आले.

हेही वाचा – शिंदे गटात जाण्यासाठी गुवाहाटीच्या हॉटेलबाहेर तळ ठोकण्याची भास्कर जाधवांची होती तयारी?

- Advertisement -

मझरुद्दीन खान हे ओवैसी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक आणि ऑर्थोपेडिक्सचे प्रमुख होते. त्यांचा मुलगा डॉ. आबिद अली खान यांनी 2020 मध्ये असदुद्दीन ओवेसी यांच्या दुसऱ्या मुलीशी लग्न केले. या घटनेची माहिती देताना पश्चिम विभागाचे डीसीपी ज्योएल डेव्हिस यांनी सांगितले की, मझहरुद्दीन खान यांनी मालमत्ता आणि कौटुंबिक वादातून स्वत:वर गोळी झाडली. त्यांच्याकडे बंदुकीचा परवाना होता आणि आत्महत्येसाठी त्यांनी हीच बंदूक वापरली होती का, याचा तपास केला जात आहे.

हेही वाचा – दिल्लीतील सीबीआय चौकशीवरून शेलारांनी ठाकरेंना घेरलं; केजरीवालांच्या भेटीबाबत मोठं विधान

- Advertisment -