औवेसी यांचे वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले… मुघल सम्राटांच्या बायका कोण होत्या?

औवेसी यांचे वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले... मुघल सम्राटांच्या बायका कोण होत्या?
Owesi's controversial statement

असदुद्दीन औवेसी (Owesi) यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये एक पत्रकार परिषदेतील व्हिडिओ आहे. औवेसी यांच्या या व्हिडिओवरून वाद होण्याची शक्यता आहे. या व्हिडिओत त्यांनी मुघलांशी भारतीय मुस्लिमांचा कोणताही संबंध नाही पण मुघर सम्राटांच्या बायका कोण होत्या? असा प्रश्न विचारला आहे. ज्ञानवापी मशिद आणि कुतुब मिनार वरुन सुरू असलेल्या वादावर (controversial statement) औवेसी यांनी हे वक्तव्य केले आहे.

काय आहे इतिहास –

1669 मध्ये औरंगजेबाने ती तोडून मशीद बांधली मंदिर-मशीद संदर्भात अनेक वाद झाले आहेत, पण हे वाद स्वातंत्र्यापूर्वीपासून आहेत. 1809 मध्ये, जेव्हा हिंदूंनी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशीद यांच्यामध्ये एक लहान जागा बांधण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेथे भीषण दंगली झाल्या. 1991 मध्ये काशी विश्वनाथ मंदिराच्या पुजाऱ्यांच्या वंशजांनी वाराणसी दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेत म्हटले आहे की, मूळ मंदिर 2050 वर्षांपूर्वी राजा विक्रमादित्यने बांधले होते. 1669 मध्ये औरंगजेबाने ती तोडून मशीद बांधली.

काय आहे प्रकरण –

काशीतल्या ज्ञानवापी मशिदीच्या भीतींवर हिंदू मूर्ती आहेत आणि तिथे प्रार्थना करण्याची परवानगी मिळाली अशी याचिका पाच महिलांनी केली होती. हे प्रकरण कोर्टात गेले. सुनावणी झाली. मशिदीचे सर्वेक्षण झाले आणि आता तेथे शिवलिंग सापडल्याचा दावा केला जात आहे. आता प्रकरण कोर्टात गेले आहे. हिंदू पक्षाने सर्वेक्षणात शिवलिंग सापडल्याचा दावा केला आहे. तर मुस्लिम पक्षाने हिंदू पक्षाने केलेल्या दाव्याला आक्षेप घेतला आहे. वजू खान्यात सापडलेली रचना ही कारंज्याची आहे, ते शिवलिंग नाही असा दावा केला आहे.