घरताज्या घडामोडीCorona Effect: ऑक्सफर्ड युनिवर्सिटी प्रेसचे प्रिंटिंग बंद होणार

Corona Effect: ऑक्सफर्ड युनिवर्सिटी प्रेसचे प्रिंटिंग बंद होणार

Subscribe

ऑक्सफर्ड युनिवर्सिटीत पहिले पुस्तकाची छपाई १५८६ मध्ये पहिले पुस्तक छापले गेले होते. एका स्टार चेंबरच्या डिक्रीतून छापले गेलेल्या पुस्तकाच्या निमित्ताने या ऑक्सफर्डच्या पुस्तकाच्या छपाईला सुरूवात झाली. पण येत्या काही महिन्यांमध्ये मात्र हा ऑक्सफर्ड प्रिटिंगच्या छपाईचा शेकडो वर्षांचे प्रिटिंगचा इतिहास यानिमित्ताने पुर्णविराम घेणार आहे. ऑक्सफर्ड युनिवर्सिटीने येत्या ऑगस्ट महिन्यात छपाई बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पुस्तकांच्या विक्रीत झालेली घट पाहता ऑक्सफर्ड प्रिटिंग प्रेसने एक मोठा निर्णय घेतला आहे. ऑक्सफर्ड प्रिटिंग प्रेसमधील अखेरच्या २० जणांच्या नोकऱ्या या निर्णयामुळे जाणार आहेत. येत्या २७ ऑगस्टला ही प्रिटिंग संपुष्टात येईल असे ऑक्सफर्डकडून स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कमी होत गेलेली पुस्तकाची मागणी हेच कारण प्रामुख्याने समोर आले आहे. तर कोरोनाच्या महामारीचाही परिणाम हा पुस्तकाची मागणी कमी होण्यावर झाला आहे. त्यामुळे कोरोनाची झळ पोहचलेल्या उद्योगांमध्ये ऑक्सफर्ड युनिवर्सिटीची प्रिटिंग प्रेसही सुटलेली नाही.

पहिले पुस्तक छापल्याचा इतिहास

येत्या २७ ऑगस्टला बंद करण्यात येणाऱ्या प्रिटिंगसाठी कर्मचाऱ्यांसोबत वाटाघाटी करूनच हा निर्णय घेतल्याचे ऑक्सफर्ड युनिवर्सिटीने स्पष्ट केले आहे. ऑक्सिनीप्रिंट बंद केल्यामुळे २० कामगारांच्या नोकऱ्या जाणार आहेत. सातत्याने कमी होत जाणारा पुस्तकांच्या खपाचा आकडा हेच मुख्य कारण प्रिटिंग प्रेस बंद करण्यामागे ठरले आहे. कमी होणाऱ्या पुस्तकाच्या मागणीसाठी कोरोनाची महामारी हेदेखील एक कारण आहे. ऑक्झनीप्रिंट या प्रिंटिंग प्रेसला अनेक वर्षांचा इतिहास आहे. पहिल पुस्तक हे १४७८ मध्ये छापले गेले. इंग्लंडमध्ये कॅक्सटॉनने प्रिटिंग प्रेस उभारून हे पुस्तक छापले होते. पण त्यानंतर संपुर्ण एक दशकात एकही प्रिटिंग प्रेस उभारली गेली नाही. ऑक्सफर्ड युनिवर्सिटीत १५८६ पहिल्यांदा पुस्तक छपाईला सुरूवात झाली. त्यानंतर चार्ल्स १ यांनी त्यापुढच्या काळात सर्व प्रकारची पुस्तके छपाईचे काम पुढे नेले.

- Advertisement -

प्रिटिंगच्या कामाचे आऊटसोर्सिंग

ऑक्सफर्ड युनिवर्सिटी प्रेस ही स्वतःच्या अशा प्रिटिंग विभागापासून १७ व्या शतकापासून कार्यरत आहे. किंग जेम्स बायबल ते अनेक विद्वानांच्या कामाची छपाई या प्रेसच्या निमित्ताने झाली. ऑक्सफर्ड प्रिटिंग प्रेसने पहिल्यांदाच पुस्तक छपाईचे काम आऊटसोर्स करण्याची सुरूवात ही १९८९ मध्ये दिली. पण ऑक्सफर्ड युनिवर्सिटीने छपाईचे काम बाहेर द्यायला सुरूवात केली तेव्हा छपाईची गुणवत्ता हे नेहमीच त्यांच्यासमोर आव्हान राहिले. अनेकदा पुस्तके आणि जरनल इतर ठिकाणी छपाई केल्यावर ही गुणवत्ता टिकवण्याचे आव्हान हे ऑक्सफर्ड युनिवर्सिटी प्रेससमोर राहिले. ऑक्सनप्रिंट्स बंद करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर अनेकांनी या निर्णयाचा विरोध केला आहे. बाहेर देण्यात आलेले काम आणि सरकारी योजना न स्विकारल्याचा परिणाम म्हणजे ही प्रिटिंग बंद करण्याची वेळ आली असल्याचीही टीका यानिमित्ताने झाली आहे.

कामगारांच्या नोकरीवर गदा

ऑक्सफर्ड युनिवर्सिटी प्रेसमध्ये कार्यरत असलेल्या एकुण २० जणांवर शेवटच्या टप्प्यातील छपाई बंदीच्या निर्णयाची गदा आली आहे. पण या सर्व कामगारांना इतर कामांमध्ये सामावून घेण्याचेही ठरले आहे. पण प्रिटिंगचे काम करणाऱ्यांपैकी अनेकांचे म्हणणे आहे की, प्रिटिंग प्रेसमधील काम हे अतिशय कुशलतेचे आणि विशेष असे काम होते. त्यामुळे या प्रिंटिंग प्रेसमधील कामाशिवाय इतर कोणत्याही कामाचा विचार करणे अशक्य आहे अशा अनेकांच्या प्रतिक्रिया आहेत. ऑक्सफर्ड प्रिटिंग प्रेसनेही आपल्या खुलाशात स्पष्ट केले आहे की, हा आमच्यासाठी सोपा निर्णय नव्हता. पण प्रिटिंग प्रेस बंद करण्याच्या निर्णयासाठी आम्ही संपुर्ण टीमचे आभार मानत आहोत. गेल्या अनेक वर्षात आम्हाला सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे आभार ऑक्सफर्ड युनिवर्सिटी प्रेसच्या माध्यमातून मानण्यात आले आहेत.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -