Monday, May 10, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Oxygen Parlour ठरताहेत वरदान, १० मिनिटात ऑक्सिजन लेव्हलमध्ये होतेय वाढ

Oxygen Parlour ठरताहेत वरदान, १० मिनिटात ऑक्सिजन लेव्हलमध्ये होतेय वाढ

Related Story

- Advertisement -

देशात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असून रुग्णालय व्यवस्था व्हेंटिलेटर आली आहे. अनेक रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रुग्णासह नातेवाईकांना ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्यासाठी वणवण करावी लागत आहे. दरम्यान अशाच रुग्णांचा मदतीसाठी अनेक आरोग्य संघटना , सामाजिक संस्था विविध पातळीवर काम करत आहेत. दरम्यान केरळमधील ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी ऑक्सिजन पार्लर अशी अनोखी कल्पना राबवली जात आहे. २८ एप्रिल रोजी मानरकद इथल्या सेंट मेरी चर्चच्या ऑडिटोरियममधील कोव्हिड केअर सेंटरमध्ये पहिले ऑक्सिजन पार्लर सुरु करण्यात आले. अशाप्रकरचा हा पहिला उपक्रम केरळ राज्यामध्ये सुरु झाला आहे. दरम्यान कोट्टायम जिल्हा प्रशासनाकडून संपूर्ण जिल्ह्यात ऑक्सिजन पार्लर्स उघडण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.

केरळमधील कोट्टायम जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या मोठ्याप्रमाणात वाढत आहे. यात होम क्वारंटाइन असलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. दरम्यान अशा रुग्णांच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी तपासून गरज भासल्यास त्यांना ऑक्सिजन पार्लरच्या माध्यमातून ऑक्सिजन पुरवले जाते. या पार्लरमध्ये कॉन्सन्ट्रेटर मशीन असून, ते दिवसाचे २४ तास ऑक्सिजन पुरवते. प्रति मिनिटाला पाच लीटर इतका ऑक्सिजन या मशीनच्या माध्यमातून पुरवले जाते. हे मशीन आजूबाजूच्या वातावरणातून ऑक्सिजन घेऊन ते ९३ टक्के शुद्ध करुन रुग्णाला दिले जाते. त्यामुळे ऑक्सिजन साठा संपू शकत नाही. दरम्यान या एका युनिटची किंमत सुमारे ५० हजार रुपये आहे.

- Advertisement -

या पार्लरमध्ये आलेल्या रुग्णांना दोन मिनिटे विश्रांती घेतल्यानंतर पल्स ऑक्सिमीटरच्या साहाय्याने रक्तातील ऑक्सिजनची पातळी मोजली जाते. दरम्यान रक्तातील ऑक्सिजनची पातळी ९४ टक्के कमी असेल तर रुग्णांना या पार्लरमधील मशीनच्या साहाय्याने ऑक्सिजन दिले जाते. तसेच या मशीनच्या किऑस्कमध्ये असलेला ऑक्सिजन मास्क सॅनिटाइझ करुव रुग्णांनी वापरायचाअसतो. तसेच नाक आणि तोंड झाकेल अशा पद्धतीने मास्क लावून मशीन सुरु केली जाते.

रुग्णाला १० मिनिटे ऑक्सिजन दिल्यानंतर पुन्हा रक्तातल्या ऑक्सिजनची पातळी मोजली जाणार आहे. ती जर ९४ टक्क्यांवर गेली असेल तर रुग्णाला घरी पाठवले जाईल. जर ऑक्सिजनची पातळी ९४ टक्क्यांच्या वर गेली नसेल, तर रुग्ण आणखी एकदा मशीन वापरू शकतो. घरी राहत असलेल्या रुग्णांसाठी अशा प्रकारची केरळ राज्यातली ही पहिलीच सुविधा आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातल्या सर्व कोविड फर्स्ट लाइन ट्रीटमेंट सेंटर्सवर, तसंच अन्य ठिकाणी ही ऑक्सिजन पार्लर्स उघडली जाणार आहेत, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यासाठी स्वयंसेवी संस्था, नागरी संघटना आणि दानशूर व्यक्तींनी सहकार्य करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे, जेणेकरून अधिकाधिक मशीन्स उपलब्ध होऊ शकतील.


 

- Advertisement -