Tuesday, May 11, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE धक्कादायक! आंध्रा प्रदेशात ऑक्सिजन तुटवड्यामुळे १६ कोरोना रुग्णांचा बळी

धक्कादायक! आंध्रा प्रदेशात ऑक्सिजन तुटवड्यामुळे १६ कोरोना रुग्णांचा बळी

Related Story

- Advertisement -

देशात वाढती कोरोना रुग्णसंख्या आरोग्य व्यवस्थेवरचा ताण अधिक वाढत आहे. अनेकदा रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, इंजेक्शन अभावी कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. यात आंध्रप्रदेशातील अनंतपूर आणि कुरनूल येथील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन तुटवड्यामुळे १६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याचा दुदैवी घटना घडली आहे. आंध्रप्रदेशमध्ये अनंतपूरमधील सरकारी रुग्णालया ११ रुग्णांनी प्राण सोडले तर कुरनूलच्या एका खासगी रुग्णालयात शनिवारी पाच रुग्ण दगावले आहेत. कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असताना अचानक ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

अनंतपूरच्या जीजीएचमध्ये शुक्रवारी ११ रुग्णांचा मृ्त्यू झाला, पण रुग्णांच्या मृत्यूमागील कारण स्पष्ट केले नाही, रुग्णांचा मृत्यू हा ऑक्सिजन पुरवठा खंडीत झाल्याने रुग्ण दगावल्याचा वृत्ताला जीजीएचच्या डॉक्टरांनी दुजोरा दिला आहे. यावेळी बोलताना डॉक्टरांनी सांगितले की, ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या यंत्रणेत तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने चेन्नईहून आलेल्या पथकाकडून दुरुस्ती केली जात आहे. तर दुसरीकडे अनंतपूरचे जिल्हाधिकारी जी.चंद्रुडू यांनी सांगितले की, जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता नसून पुरवठा कमी दाबाने होत असल्याचा तक्रारी येत होत्या त्यामुळे पुरवठा होणारी वाहिनी तपासली जात आहे.

- Advertisement -

मुख्य आरोग्य सचिव यांनी देखील या घटनेवर स्पष्टीकरण दिले आहे. यावर बोलताना सचिव म्हणाले की, रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनअभावी झालेला नाही. दरम्यान आमदार अनंत वेंकटरमी रेड्डी यांनी अनंतपूर येथील जीजीएच रुग्णालयाला भेट देत तेथील डॉक्टरांशी चर्चा केली. यावर रुग्णालय व्यवस्थापनाने स्पष्टीकरण दिले की, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता नाही, मात्र मृतांच्या नातेवाईक रुग्णाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याचा आरोप करत आहेत. असे रेड्डी यांनी स्पष्ट केले.

दरम्यान अनंतपूरमधील घटना जाती असतानाच शनिवारी कुरनूलमधीस एका खासगी रुग्णालयात पाच कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सरकारची परवानगी नसताना या रुग्णालयात करोना रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे आरोप केले जात आहेत. नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका रुग्णालय व्यवस्थापनावर ठेवत तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी रुग्णालयाच्या व्यवस्थापकीय संचालकांना अटक केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच रुग्णालय व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


- Advertisement -

 

- Advertisement -