Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी खिशात ऑक्सिजन बॉटल भरा अन् हव तिथे फिरा, IIT कानपूरचे संशोधन

खिशात ऑक्सिजन बॉटल भरा अन् हव तिथे फिरा, IIT कानपूरचे संशोधन

Related Story

- Advertisement -

देशात कोरोना दुसऱ्या लाटेने गेल्या काही महिन्यात कहर केला. पण आता दुसरी लाट मंदावत असून कोरोनाबाधितांची संख्या हळूहळू कमी होत आहे. पण जेव्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले होते, तेव्हा ऑक्सिजन कमतरता अधिक भासू लागली होती. अनेक जणांचे ऑक्सिजन अभावी मृत्यू देखील झाले. अजूनही कोरोनाचा कहर कायम त्यामुळे मास्क आणि सॅनिटायझर आपल्या हातात घेऊन अजूनही फिरावे लागत आहे. आता सॅनिटायझरप्रमाणे ऑक्सिजन देखील खिशात घेऊन फिरू शकता. ते कसे काय वाचा.

IIT कानपूरचा माजी विद्यार्थी आणि ई-स्पिन नॅनोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे डॉ. संदीप पाटील यांनी ऑक्सिराइज नावाची एक ऑक्सिजन बॉटल तयार केली आहे. ज्यामध्ये १० लीटर ऑक्सिजन गॅसचा साठा केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे जर एखाद्याची तब्येत बिघडली असेल तर बॉटलमधले ऑक्सिजनचा काही शॉट्स देऊन रुग्णालयापर्यंत पोहोचवले जाऊ शकते. या ऑक्सिजन बॉटलची किंमत ४९९ रुपयेपर्यंत आहे. ही ऑक्सिजन बॉटल तुम्ही ऑनलाईन देखील खरेदी करू शकता.

- Advertisement -

याबाबत डॉ. संदीप पाटील म्हणाले की, ‘महामारी दरम्यान ऑक्सिजनची गंभीर समस्यापाहून ही ऑक्सिजन बॉटल तयार करण्यात आली आहे. हे पोर्टेबल असून आपात्कालीन परिस्थितीत सहजपणे याचा वापर करू शकता. तसेच यामध्ये एक असे डिव्हाईस लावले आहे, ज्यामाध्यमातून तुम्ही रुग्णाच्या तोंडात स्प्रे करून ऑक्सिजन देऊ शकता. या ऑक्सिजन बॉटलची विक्री swasa.in या वेबसाईटवर केली जात आहे. सध्या एका दिवसात १००० बॉटलचे प्रोडक्शन केले जात आहे.’


हेही वाचा – अमेरिका फायझर, मॉडर्नाची लस पाठवण्यास तयार, मात्र भारताने यामुळे दिला नकार


- Advertisement -

 

- Advertisement -