घरदेश-विदेशOYO संस्थापकांच्या वडिलांचा 20 व्या मजल्यावरून पडून मृत्यू

OYO संस्थापकांच्या वडिलांचा 20 व्या मजल्यावरून पडून मृत्यू

Subscribe

नवी दिल्ली : ओयो रूम्सचे संस्थापक रितेश अग्रवाल यांचे वडील रमेश अग्रवाल यांचा गुरुग्राममधील इमारतीच्या 20व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे.

आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रमेश अग्रवाल यांचा इमारतीच्या 20 व्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला. गुरुग्राममधल्या डीएलएफ ‘द क्रेस्ट’ सोसायटीत अग्रवाल कुटुंब राहात होते. याच इमारतीत रितेश अग्रवाल याचेही घर आहे. रमेश अग्रवाल हे दुपारी एकच्या सुमारास घराच्या बालकीन होते. यावेळी बालकीतून पडून त्यांचा मृत्यू झाला. मात्र. रमेश अग्रवाल बाल्कनीतून खाली कसे पडले याचा तपास पोलीस करत आहेत. ही घटना घडली त्यावेळी मुलगा रितेश अग्रवाल, सून आणि रमेश अग्रवाल यांची पत्नी घरातच होते, अशी पोलिसांनी माहिती दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘सब याद रखा जाएगा, जवाब वक्त आने पर मिलेगा’; लालूंच्या मुलीचा केंद्र सरकारला इशारा

रितेश अग्रवालचे तीन दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. लग्नाच्या अवघ्या तीन दिवसांनी ही दुःखद घटना घडल्यामुळे परिवारावर शोककळा पसरली आहे. रितेश अग्रवालने दिल्लीतील फॉर्मेशन व्हेंचर्सच्या संचालक गीतांशा सूदशी हिच्याशी तीन दिवसांपूर्वीच लग्न केले होते. या लग्नात देशातील अनेक प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या.

- Advertisement -

रितेश अग्रवालने वडिलांच्या निधनाची दिली माहिती
रितेश अग्रवालने एक निवेदनात म्हटले की, ‘जड अंत:करणाने मी आणि माझे कुटुंबिय हे कळवू इच्छितो की माझे वडील रमेश अग्रवाल यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाने आमच्या कुटुंबाचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. या दुःखाच्या प्रसंगी, आम्ही सर्वांना त्यांच्या वैयक्तित गोष्टींचा आदर करण्याची विनंती करतो.’

हेही वाचा – धक्कादायक : H3N2 इन्फ्लूएंझामुळे देशात 2 मृत्यू; 90 प्रकरणे समोर

ओयो रुम्सची स्थापना
रितेशने २०१३ मध्ये ओयो रूम्सची भारतात स्थापना केली. यासाठी रितेशने भारतभर प्रवास केला आणि तिथून त्याला ओयो स्थापन करण्याची कल्पना सुचली. ओयो रुम्सची स्थापना केल्यानंतर जगभरात ओयो हॉटेल चेनचा वेगाने प्रसार झाला. आज जगभरातील 35 हून अधिक देशांमध्ये 1.5 हॉटेलबरोबर ओयो संलग्न आहे. नागरिकांना परवडेल अशा किमतीत रुम्स बुक करण्याची सुविधा ओयोने दिल्याने ग्राहकांचाही ओयोला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -