Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश १०६ पद्म पुरस्कारांचे वितरण; राष्ट्रपतींच्या हस्ते झाला गौरव

१०६ पद्म पुरस्कारांचे वितरण; राष्ट्रपतींच्या हस्ते झाला गौरव

Subscribe

नवी दिल्लीः १०६ पद्म पुरस्कारांचे बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. सर्व प्रथम प्रोफेसर बालकृष्ण दोषी यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या मुलीने हा पुरस्कार स्विकारला. त्यानंतर उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांंना पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले.

कुमार बिर्ला हे बिर्ला परिवारातील चौथे व्यक्ति आहेत ज्यांना पद्म पुरस्कार मिळाला आहे. याआधी त्यांची आई राजश्री बिर्ला, आजोबा बसंत कुमार बिर्ला आणि पंजोबा घनश्याम दास बिर्ला यांना पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

- Advertisement -

पंडवीन गायिका उषा यांंना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. हा पुरस्कार घेण्याआधी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जमीनीवर बसून नमस्कार केला. नंतर त्यांनी पुरस्कार स्विकारला. कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री भूपेंद्र सिंग व अन्य मंत्री उपस्थित होते.

भारत सरकारने ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यंदाच्या वर्षी ६ पद्मविभूषण, ९ पद्मभूषण आणि ९१ पद्मश्री अशा एकूण १०६ जणांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले. झाडीपट्टी रंगभूमीचे कलाकार परशुराम खुणेंना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. नक्षल प्रभावग्रस्त भागातील युवकांचे पुनर्वसन यासह सामाजिक कारणांसाठी लोकनाट्य कलेचा वापर करण्याच्या योगदानाचा सन्मान म्हणून परशुराम खुणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला.

- Advertisement -

चिकित्सा (बालरोग) क्षेत्रात ओआरएसचे जनक दिलीप महालनोबिस यांना पद्मविभूषण (मरणोत्तर) देण्यात आला आहे.  पश्चिम बंगालमधील ८७ वर्षीय डॉक्टरांनी ओआरएसच्या व्यापक वापरासाठी पुढाकार घेतला, ज्यांनी जागतिक स्तरावर ५ कोटींपेक्षा अधिक जणांचा जीव वाचवला आहे.

अंदमान आणि निकोबारमधील जोरबा जमातीमध्ये काम करणाऱ्या रतन चंद्र कार यांना पद्मश्री देण्याची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय हिरा बाई लोबी, मुनीश्वीर चंद्र डावर, रामकुई वांगवे न्यूमे, वीपी अप्पकुट्टन पुदुवाल, कपिल देव प्रसाद यांना पद्मश्री देण्यात आला आहे. तबलावादक झाकीर हुसेन यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला

- Advertisment -