नुपूर शर्मा प्रकरण- महाराष्ट्र, दिल्ली,कोलकाता, युपीमध्ये राडा, गोळीबार,दगडफेकीत पोलीस जखमी

पैगंबर मोहम्मद यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्याविरोधात देशभऱात संतापाची लाट उसळली आहे. देशभरात AIMIM सह इतर मुस्लीम संघटना आक्रमक झाल्या असून आज शुक्रवारचे नमाज पठण झाल्यानंतर महाराष्ट्रासह, दिल्ली, कोलकाता, युपीसह रांचीमध्ये शर्मा यांच्याविरोधात जनक्षोम उसळला. यावेळी रांचीमध्ये संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. यात अनेक पोलीस जखमी झाले आहेत. याचपार्श्वभूमीवर हिंसक जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.

तर महाराष्ट्रातील सोलापूर, औरंगाबाद येथे एमआयएमनेही आंदोलन पुकारले. यावेळी एमआयएमचे इम्तियाज अलीदेखील उपस्थित होते. तर अहमदनगर ते दिल्लीतील जामा मशिदीपासून कोलकाता आणि उत्तर प्रदेशमधील अनेक शहरांमध्ये नुपूर शर्मा आणि नवीन जिंदल यांच्याविरोधात हजारोच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. प्रयागराज येथे जमावाने पोलिसांवर जोरदार दगडफेक केली. हावडा येथेही आंदोलनकर्त्यांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक करत धुडगूस घातला. त्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधूराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.

लखनौ- देवबंदमध्येही निदर्शने

उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौबरोबरच देवबंद, प्रयागराज आणि सहारनपुर येथेही मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले होते. यावेळी पोलिसांनी अनेक आंदोलनकत्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी शांततेचा भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.

जामा मशिदीत जोरदार घोषणाबाजी

आज शुक्रवार असल्याने जामा मशिदीत मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव नमाज पठण करण्यासाठी आले होते. यावेळी पैंगबर मोहम्मद यांचा अवमान करणाऱ्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदल यांच्यावर कारवाई करण्यात यावी त्यांना तुरुंगात टाकण्यात यावे अशी मागणी करत नागरिकांनी जोरदार नारेबाजीही केली. दरम्यान, या आंदोलनाबद्दल आपल्याला कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती अशी माहिती जामा मशिद प्रशासनाच्या इमामांनी दिली आहे.

हैदराबादमध्ये आंदोलन
तेलंगानाची राजधानी असलेल्या हैदराबादमध्येही या आंदोलनाचे लोण पसरले असून जागोजागी नुपूर शर्मा, राजा सिंह यांच्यासह इतरांविरोधात निदर्शने केली जात आहेत. हैदराबाद येथील मक्का मशिद, चार मिनार, अजीजिया मशिद, हुमायू नगर, मशिद ए कुबा, वादी ए मुस्तफा, मशिद ए सैयदना ओमर फारूक, चंद्रयानगुटासह इतर ठिकाणी मोठ्या संख्येने मुस्लीम समुदायातील नागरिक शर्मा आणि राजाविरोधात घोषणाबाजी करत आहेत.

aurangabad

रांचीत मुस्लीम समुदायाचे हिंसक आंदोलन

या आंदोलनाची धग रांची येथेही पोहचली असून मेन रोडवर हिंसक आंदोलन सुरू झाले आहे. गर्दीला पांगवण्यसाठी पोलिसांना हवेत बंदुकीच्या फैरीही झाडाव्या लागल्या . यावेळी हिंसक जमावाने पोलिसांवर दगडफेक केली.यात अनेक पोलीस जखमी झाले आहेत. करावा लागला. यामुळे अधिकच चिडलेल्या जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. हावडा येथेही आंदोलनकत्यांनी राष्ट्रीय महामार्ग अडवला. रस्त्यावर टायर जाळण्यात आले.

आंदोलनकर्त्यांकडून नुपूर शर्मा यांना अटक करण्याची मागणी होत आहे. याचपार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस अलर्ट झाले असून शर्मा यांच्या घराभोवती पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दरम्यान, वेगवेगळ्या धर्मांना लक्ष्य करत आक्षेपार्ह विधान करून शांततेचा भंग केल्याप्रकरणी दिल्लीच्या सायबर युनिटने भाजपच्या माजी राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्यासह नवीन जिंदल, असदुद्दीन ओवैसी, शादाब चौहान, सबा नकवी , मौलाना मुफ्ती नदीम, अब्दुर रहमान, गुलजार अंसारी, यति नरसिहांनंद, दानिश कुरैशी, विनीता शर्मा, यांच्यासह अनिल कुमार मीना आणि पूजा शकुन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.