घरदेश-विदेशतालिबान्यांच्या ताब्यानंतर २८ दिवसांनी पाकिस्तान एअरलाइन्सचे विमान काबूल विमानतळावर झाले लँड!

तालिबान्यांच्या ताब्यानंतर २८ दिवसांनी पाकिस्तान एअरलाइन्सचे विमान काबूल विमानतळावर झाले लँड!

Subscribe

तालिबान्यांनी अफगाणिस्तान हस्तगत केल्यानंतर साधारण एका महिन्यानंतर पहिले कमर्शियल फ्लाइट काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँड झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्ट २०२१ रोजी अमेरिकन सैन्य माघारीनंतर तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तान ताब्यात घेण्याची घोषणा केली. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे विमान सोमवारी हमीद करजई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले. मात्र, हे विमान लँड झाल्यानंतर या विमानात केवळ १० प्रवासी होते. यामध्ये प्रवाशांपेक्षा जास्त संख्याही कर्मचाऱ्यांची असल्याचे सांगितले जात आहे.

काही दिवसांपूर्वी तालिबानच्या प्रवक्त्याने अशी माहिती दिली की, तुर्की, संयुक्त अरब अमिरात आणि कतारचे तांत्रिक संघ आणि तज्ज्ञ अफगाणिस्तानला विमानतळावरून कामकाज सुरळीत करण्यास मदत करत आहेत. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणे लवकरच विमानतळावरून पुन्हा सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांनी असेही सांगितले की, विमानतळ लवकरच ऑपरेशनसाठी सज्ज होईल. या विमानतळाचे काही भाग दुर्दैवाने अमेरिकन सैन्याने खराब केले असून कतार आणि यूएईच्या सहकार्याने त्याच्या दुरुस्तीचे कामकाज केले जात आहे. त्यामुळे लवकरच काबूल विमानतळ लोकांसाठी खुले करण्यात येणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, १५ ऑगस्टपर्यंत संपूर्ण अफगाणिस्तान हस्तगत केल्यानंतरही काबुल विमानतळ ३१ ऑगस्टपर्यंत अमेरिकन सैन्याच्या नियंत्रणाखाली होते. या ठिकाणाहून एक लाखापेक्षा अधिक लोकांना सुरक्षित बचावण्यात आले आणि वेगवेगळ्या देशांमध्ये स्थलांतरीत करण्यात आले. ऑपरेशन दरम्यान लाखो लोक विमानतळावर उपस्थित होते. बचाव कार्य सुरू असताना आणि संपल्यानंतर विमानतळाचा काही भाग खराब झाला. कतार आणि इतर देशांच्या मदतीने तालिबानने त्याची दुरुस्ती केली असल्याचे सांगितले जात आहे.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -