Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश Video : भारतीय जवानांनी पाकिस्तानचा घुसखोरीचा प्रयत्न लावला उधळून

Video : भारतीय जवानांनी पाकिस्तानचा घुसखोरीचा प्रयत्न लावला उधळून

भारतीय जवानांनी पुन्हा एकदा पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीम (बॅट) च्या सैनिकांनी घुसखोरी केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय जवानांनी उधळून लावला आहे.

Related Story

- Advertisement -

पाकिस्तानचा माज काही केला कमी होताना दिसत नाही. पाकिस्तानचे दहशतवादी आणि घुसखोरांना पाठबळ देण्याचे उद्योग अजूनही सुरु असून पाकिस्तानच्या वर्तवणुकीत अद्याप सुधारणा होत नसल्याचे दिसत आहे. भारतीय जवानांनी पुन्हा एकदा पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीम (बॅट) च्या सैनिकांनी घुसखोरी केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय जवानांनी उधळून लावला आहे. १२ आणि १३ सप्टेंबर रोजी पाकिस्तानकडून हाजीपूर सेक्टरमध्ये हा घुसखोरीचा प्रयत्न केला गेला होता. मात्र, भारतीय जवानांनी या घुसखोरांवर ग्रेनेड हल्ले करुन त्यांचा खात्मा केला आहे. हा व्हिडिओ समोर आला आहे.

पाकिस्तानी ‘बॅट’ च्या घुसखोरांचे प्रयत्न उधळले

- Advertisement -

भारताकडून समज देण्यात येऊनही पाकिस्तानकडून घुसखोरीचे प्रयत्न सुरुच असल्याचे दिसून येत आहेत. ‘एलओसी’ वर पाकिस्तानच्या जवळपास १५ घुसखोरांकडून करण्यात आलेला घुसखोरीचा प्रयत्न भारतीय जवानांनी उधळून लावला आहे. जवानांनाकडून पाकिस्तानी ‘बॅट’ च्या घुसखोरांचे प्रयत्न उधळून लावले जात आहेत. कलम ३७० हटवण्यात आल्यापासून चवताळलेला पाकिस्तान कायम काहीना काही कुरापती करत आहे. ऑगस्टमध्ये देखील पाकिस्तानकडून एलओसीवर घुसखोरीचा प्रयत्न केला गेला होता. जो भारतीय जवानांनी उधळून लावला होता. काश्मीर खोरे कायम अशांत ठेवण्यासाठी पाकिस्तानकडून सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, पाकिस्तानच्या कुरापतींचा व्हिडिओ समोर आल्याने पाकिस्तान आता जगासमोर तोंडघशी पडला आहे.


हेही वाचा – सुरक्षा दलाने हाणून पाडला पाकिस्तानी ड्रोनचा घुसखोरीचा प्रयत्न


- Advertisement -

 

- Advertisement -