घरदेश-विदेशव्हॉट्सअॅप मॅसेजमुळे पाकिस्तानच्या न्यायधीशांनी थांबवला खटला

व्हॉट्सअॅप मॅसेजमुळे पाकिस्तानच्या न्यायधीशांनी थांबवला खटला

Subscribe

व्हॉट्सअॅपवर बदलीचा मॅसेज आल्यानंतर पाकिस्तानच्या न्यायाधीशांनी चालू खटला थांबवला. मात्र तो मॅसेज चुकीचा होता, अशी माहिती काही काळाने समोर आली. त्यामुळे ही घटना म्हणजे पाकिस्तानच्या न्याय व्यवस्थेतील काळा दिवस आहे, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानच्या ज्येष्ठ वकिलांनी दिली.

व्हॉट्सअॅपवर बदलीचा मॅसेज प्राप्त झाल्यामुळे पाकिस्तानच्या एका न्यायधीशाने चालू खटला थांबवल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे पाकिस्तानची पुन्हा नाचक्की होत आहे. याशिवाय न्यायधीशावरही टीका होत आहे. अंमली पदार्थांच्या तस्करी संदर्भात पाकिस्तानचे माजी कायदेमंत्री राणा सनाउल्लाह यांच्या विरोधात पाकिस्तानच्या स्पेशल कोर्टात खटला सुर होता. न्यायमुर्ती मसूद अर्शद यांच्या नेतृत्वाखाली हा खटला सुरु होता. दरम्यान, अचानक मसूद यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअॅप मॅसेज आला. या मॅसेजमध्ये त्यांच्या बदलीची माहिती होती. बदलीची माहिती मिळताच मसूद यांनी खटला थांबवला आणि आपली बदली झाल्याचे म्हटले. मात्र, खटला थांबवल्यानंतर काही काळाने तो मॅसेज चुकीचा असल्याची बाब उघड झाली. अर्थात बदलीची माहिती पत्रव्यव्हाराद्वारे दिली जाते, ती व्हॉट्सअॅपद्वारे दिली जात नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

हेही वाचा – मी भाजपमध्ये जाणार नाही – भास्कर जाधव

- Advertisement -

मंत्र्याच्या गाडीत १५ किलो हिरॉईन

पाकिस्तानचे विरोधी पक्षनेते आणि माजी कायदेमंत्री राणा सनाउल्लाह यांच्या गाडीत १५ किलो हिरॉईन सापडले होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बुधवारी यासंदर्भात पाकिस्तानच्या विशेष कोर्टात खटला सुरु होता. यावेळी राणा यांच्या गाडीत कशाप्रकारे हिरॉईन मिळाले याचा व्हिडिओ कोर्टात सादर केला जात होता आणि अचानक न्यायाधीशांच्या मोबाईलवर एका अनोळख मोबाईल नंबरवरुन बदलीचा व्हाट्सअॅप मॅसेज आला. त्यामध्ये बदलीचा खोटा मॅसेज होता. मॅसेज वाचल्यानंतर न्यायाधीशांनी खटला थांबवला आणि म्हणाले, मला व्हॉट्सअॅपवर नुकताच एक मॅसेज मिळाला. त्यामुळे मी हा खटला थांबवण्यचा निर्णय घेत आहे. माझी बदली आता लाहोर उच्च न्यायालयात झाली आहे.

‘पाकिस्तानच्या न्यायव्यवस्थेसाठी हा काळा दिवस’

‘पाकिस्तानमध्ये असा प्रकार पहिल्यांदा घडला आहे. कोर्ट राणा सणाउल्लाह यांना जामीन देण्याच्या तयारीत होते. त्यामुळे असा गैरप्रकार घडला. याप्रकरणी पाकिस्तानच्या सरन्यायाधीशांनी योग्य तो निर्णय घ्यावा. कारण अशाप्रकारची घटना घडणे ही क्लेशदायक आणि वाईट घटना असून पाकिस्तानच्या न्यायव्यवस्थेसाठी हा काळा दिवस आहे’, असे पाकिस्तानचे एक ज्येष्ठ वकील पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -