दहशतवादी अशरफचा मोठा खुलासा; घातपातासाठी इंडिया गेट, लाल किल्लासह १० ठिकाणांची केली रेकी

pak terrorist had conducted recce of 10 places including india gate delhi high court blast
दहशतवादी अशरफचा मोठा खुलासा; घातपातासाठी इंडिया गेट, लाल किल्लासह ११ ठिकाणांची केली रेकी

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मंगळवारी पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद अशरफला अटक केली. चौकशीदरम्यान अशरफने भारतविरोधी कारवायांसंदर्भात मोठे खुलासे केले आहेत. अशरफचा गेल्या काही वर्षांत देशातील दहशतवादी घटनांमध्ये सक्रिया सहभाग होता. २०११ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयासमोर झालेल्या बॉम्बस्फोटात अशरफ सामील होता. यासाठी त्याने दिल्ली उच्च न्यायालयाची अनेकदा रेकी केली होती. पूर्व दिल्लीहून तो दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झाला होता.

याशिवाय जम्मू-काश्मीरमध्ये त्याच्यासमोर अनेक भारतीय जवानांचा दहशतवाद्यांनी अपहरण केल्याचा खुलासाही त्याने चौकशीदरम्यान केला आहे. या अपहरण केल्या जवानांना दहशतवाद्यांनी काही काळ ओलिस ठेवत त्यांची गळा आवळून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक माहिती त्याने दिली आहे. अशरफची NIA, RAW आणि MI या केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी सुरु आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानी दहशतवादी अशरफने आयटीओस्थित पोलीस मुख्यालयाची देखील रेकी केली होती. यावर अशरफने खुलासा केला की, घातपात घडवून आणण्यासाठी त्याने देशातील अनेक मुख्य ठिकाणांची रेकी केली. परंतु पोलीस मुख्यालयाची रेकी करताना अधिक माहिती घेता आली नाही. कारण पोलीस मुख्यालया बाहेर कोणालाही थांबू दिले जात नाही.

याशिवाय आयएसबीटीची रेकी करत त्याने सर्व माहिती पाकिस्तानमधील त्याचा सहकाऱ्यांना पाठवली होती. याशिवाय देशात मोठा घातपात घडवण्यासाठी अशरफने इंडिया गेट, लाल किल्ला आणि देशभरातील १० महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी केली असल्याची माहिती दिली आहे. यादरम्यान त्याने सांगितले की, पाकिस्तानी दहशवाद्यांच्या निशाण्यावर यावेळी व्हीआयपी ठिकाणं नव्हती कारण तेथे कमी लोकांचा मृत्यू झाला असता. त्यामुळे गर्दीची ठिकाणं यावेळी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होती.  या सर्व रेकी त्याने काही वर्षांपूर्वी केल्या होत्या. मात्र देशातील नेमकी कोणती ठिकाणं दहशतवाद्यांच्या निशाणावर होती याविषयी खुलासा केला नाही.

अशरफने चौकशीदरम्यान भारतात कसा आला याविषयी देखील खुलासा केला आहे. त्याने सांगितले की, बांग्लादेशमार्गे तो पश्चिम बंगालमध्ये दाखल झाला. यावेळी त्याने कोलकत्ता यात्रा करण्यासाठी भारतात प्रवेश मिळवला होता.  तो अजमेर शरीफला देखील जाऊन आला. तेथे त्यांनी बिहारी लोकांशी ओळख निर्माण केली आणि त्यांच्यासोबत त्यांच्या गावी पोहचला. त्यानंतर तो बिहारमध्येच स्थायिक झाला. यावेळी बिहारमधील एका गावातील संरपंचाला विश्वास घेत त्याच्याकडून बनावट ओळखपत्र तयार करुन घेतले.

स्पेशल सेलच्या एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, अशऱफला पाकिस्तानमध्ये बसलेला त्याचा हँडलर नासिरला सूचना देत होता. त्यानुसार अशरफ जम्मू-काश्मीरमध्ये जात दहशतवाद्यांना भेटायचा. तसेच भारतीय जवानांच्या हालचालींवर लक्ष ठेवायचा. याशिवाय लष्कराचे गोपनिय व्हिडिओ आणि माहिती दहशतवाद्यांना पुरवत होता. त्याने पुरवलेल्या माहितीच्या आधारेच दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणले होते.

अशरफने चौकशीदरम्यान खुलासा केला की, पाक हँडलरने सोमवारी त्याला व्हॉट्सएॅपवर पाकिस्तानातून मेसेज पाठवत सांगितले की, शस्त्राचा साठा आला आहे. त्याने शस्त्राच्या साठ्यापर्यंत पोहचत तो दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी पोहचवावा. मात्र लक्ष्मीनगरमधून दहशतवादी अशरफ बाहेर पडताच त्याला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली.

या पाकिस्तानी दहशतवाद्याकडून AK-47 रायफलसह अतिरिक्त मॅग्झिन, ६० जिवंत काडतुसं, एक हातबॉम्ब, ५० जिवंत काडतुसं आणि २ अत्याधुनिक पिस्तुल जप्त असा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.