Homeदेश-विदेशPakistan about India : देशात घुसून रॉ घडवत आहे हत्याकांड..., पाकिस्तानचा थरथराट

Pakistan about India : देशात घुसून रॉ घडवत आहे हत्याकांड…, पाकिस्तानचा थरथराट

Subscribe

एकामागून एक दहशतवाद्यांच्या झालेल्या हत्यांमुळे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने गुडघे टेकले आहेत. आयएसआयचे महासंचालक नदीम अंजुम यांनी 2022मध्ये सीआयएचे संचालक विल्यम जे. बर्न्स यांच्याकडे याबाबत चिंता व्यक्त केली होती.

(Pakistan about India) इस्लामाबाद : पाकिस्तानने पुन्हा एकदा बदललेल्या भारताबाबतची भीती व्यक्त केली आहे. भारत आता देशाबाहेर दहशतवादविरोधी अभियान चालवत आहे. भारताची रॉ (Research and Analysis Wing) ही गुप्तचर संस्था आपल्या देशात घुसून लपून-छपून हत्याकांड घडवत असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. (Pakistan is afraid of the RAW)

वॉशिंग्टन पोस्टच्या अलीकडेच प्रसिद्ध झाले्लया एका रिपोर्टद्वारे ही बाब समोर आली आहे. या रिपोर्टनुसार, रॉने 2021पासून पाकिस्तानातील सुमारे अर्धा डझन लोकांना ठार मारण्यासाठी षडयंत्र रचले. पाकिस्तानने या सहा प्रकरणांचा उल्लेखही आहे. संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी घोषित केलेल्या लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद यासारख्या संघटनांतील संशयित दहशतवाद्यांना लक्ष्य करण्याचा उद्देश या हत्यांमागे होता. सुरक्षिततेच्या दृष्टीने भारताला या दोन्ही संघटनांपासून गंभीर धोका वाटतो. या संघटनांचे सदस्य भारतीय सैनिकांवरील हल्ल्यांमध्ये सामील आहेत, असे भारत मानत असल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – SC angry : भाषणबाजी करायला हे आझाद मैदान नाही, संतप्त सुप्रीम कोर्टाने सुनावले

या दहशतवाद्यांच्या हत्येसाठी रॉने भारतीय नागरिकांचा वापर केला नाही, तर स्थानिक गुन्हेगार आणि अफगाण भाडोत्री मारेकऱ्यांमार्फत हे घडवून आणले. फंडिंग आणि आपले ऑपरेशन यशस्वी करण्यासाठी दुबईस्थित व्यापारी आणि ‘हवाला’ नेटवर्कचा वापर करण्यात आला. सर्व कृत्यांबाबत गुप्तता राखण्यासाठी भारताने हे सर्व केले. गुप्त हत्यांचे ठळक उदाहरण म्हणून आमीर सरफराज तांबावर करण्यात आलेला हल्ल्याचे उदाहरण पाकिस्तानने दिले आहे. 2013मध्ये भारतीय कैदी सरबजीत सिंग याची हत्या झाली होती आणि या हत्याप्रकरणात आमीर सरफराज तांबा आरोपी होता.

- Advertisement -

हे खून घडविण्यासाठी देखरेख करणारी, खून करणारी आणि त्याचा मोबदला देणारी अशा वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या होत्या. या कृतींचा उद्देश पाकिस्तानवर धोरणात्मक दबाव आणणे आणि भारताच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक मानल्या जाणाऱ्या व्यक्तींचा खात्मा करणे आणि पाकिस्तानवर धोरणात्मक दबाव टाकण्याच्या उद्देशानेच या हत्या घडविण्यात आल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.

हेही वाचा – Tahawwur Rana : भारताकडे होणार प्रत्यार्पण टाळण्यासाठी तहव्वूर राणाचा अखेरचा प्रयत्न; काय केले पाहा…

एकामागून एक दहशतवाद्यांच्या झालेल्या हत्यांमुळे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने गुडघे टेकले आहेत. आयएसआयचे महासंचालक नदीम अंजुम यांनी 2022मध्ये सीआयएचे संचालक विल्यम जे. बर्न्स यांच्याकडे याबाबत चिंता व्यक्त केली होती. भारताच्या या कारवायांमुळे आपल्या सुरक्षा यंत्रणांचे अपयश समोर येत असल्याचा आरोप पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी केला आहे.

भारत आणि पाकिस्तानमधील हे ‘छुपे युद्ध’ खूप जुने आहे. मात्र, भारत आता ही रणनीती अधिक संघटित पद्धतीने राबवत असल्याने ती पूर्वीपेक्षा अधिक धोकादायक ठरत आहे. याबाबत पाकिस्तानी अधिकाऱ्यांना चिंता वाटत आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून भारताची रणनीती अधिक आक्रमक बनली असल्याचे या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तथापि, याबाबत भारताकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. (Pakistan about India : Pakistan is afraid of the RAW)

हेही वाचा – CJI : यावर्षात सर्वोच्च न्यायालयात असतील तीन सरन्यायाधीश, सात न्यायमूर्ती होणार निवृत्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -