घरदेश-विदेशकलम ३७० : पाकिस्तानात भारतीय चित्रपटांच्या सीडीविक्रीवर बंदी

कलम ३७० : पाकिस्तानात भारतीय चित्रपटांच्या सीडीविक्रीवर बंदी

Subscribe

भारतीय चित्रपटांवर बंदी घातल्यानंतर आता पाकिस्तानात भारतीय चित्रपटांच्या सीडीविक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे.

भारताने जम्मू-काश्मीरसंबंधीत एक ऐतिहासिक निर्णय घेतला. जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम हद्दपार करण्याच्या निर्णयानंतर पाकिस्तानवर त्याचा परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानचा तिळपापड होत असून जम्मू-काश्मीरच्या निर्णयानंतर पाकिस्ताने भारतासोबतचा व्यापार बंद केला आहे. भारत-पाकिस्तानमध्ये धावणारी समझोता एक्सप्रेस बंद केली आणि त्यानंतर भारतीय चित्रपटांवरही बंदी घालण्यात आली, असे अनेक वेगवेगळे निर्णय पाकिस्ताने घेतले आहेत. त्यानंतर आता पाकिस्तानात भारतीय चित्रपटांच्या सीडी विक्री करणाऱ्या दुकानांवरही बंदी घालण्यात आली आहे.

चित्रपटांच्या सीडींवर बंदी

पाकिस्तान सरकारकडून भारतीय चित्रपटांच्या सीडींच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘आम्ही भारतीय जाहिरातींवर बंदी आणली आहे. तसेच, भारतीय चित्रपटांच्या सीडींची विक्री करणाऱ्या दुकानांवर कडक कारवाई करणे सुरु केले आहे‘, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या माहिती आणि प्रसारण विभागाच्या विशेष सहाय्यक फिरदौस आशिक अवान यांनी सांगितले असल्याचे डॉन या पाकिस्तानी वृत्तपत्राने म्हटले आहे.

- Advertisement -

या अगोदरच राजधानीत भारतीय चित्रपटांवर बंदी आणण्यासाठी कडक कारवाई सुरू केलेली आहे. आता ही कारवाई स्थानिक पातळीवरील शासनाच्या मदतीने देशभरातील विविध भागांमध्ये केली जाणार आहे. आजच गृह मंत्रालयाकडून इस्लामाबादेत सीडी विक्री करणाऱ्या दुकानांवर छापे मारण्यात आले. या कारवाईत भारतीय चित्रपटांच्या सीडी जप्त करण्यात आल्याचे गृह मंत्रालयाने सांगितले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘जम्मू काश्मीरमध्ये भारत सरकार हे नरसंहार घडवून आणण्याच्या तयारीत आहे’


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -