घरदेश-विदेशपाकिस्तानने विकिपीडियावर बंदी का घातली? कारण ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल!

पाकिस्तानने विकिपीडियावर बंदी का घातली? कारण ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल!

Subscribe

पाकिस्तानने विकिपीडिया का ब्लॉक केलं? कारण ऐकून आश्चर्य व्हाल.

Why Pakistan block Wikipedia: पाकिस्तानने अलीकडेच विकिपीडियावर बंदी घातली आहे. त्यानंतर प्रश्न उपस्थित होत आहे की पाकिस्तानने विकिपीडिया का ब्लॉक केला? पाकिस्तानने निंदनीय मजकूर सादर केल्याचा आरोप केला होता. याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत, कारण जाणून घेतल्यानंतर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.

हा सगळा प्रकार पीटीएच्या इशाऱ्याने सुरू झाला. पाकिस्तान दूरसंचार प्राधिकरणाने (PTA) गेल्या आठवड्यात विकिपीडियाला चेतावनी दिली होती की, काही मजकूर काढून टाकण्यासाठी ४८ तासांचा अवधी आहे, जर अयशस्वी झाले तर ती साइट देशात ब्लॉक केली जाईल. पीटीएच्या प्रवक्त्याने सांगितले की, निंदनीय मजकूर काढून टाकण्यासाठी विकिपीडियाला वेळ देण्यात आला होता. पण तो पाळला नाही.

- Advertisement -

PTA वेबसाइटवरून कोणता मजकूर काढून टाकण्याबद्दल सांगण्यात आलं होतं हे स्पष्ट झालेलं नाही. परंतु या मुद्द्यावर पीटीएच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत ते आपल्या वेबसाइटवरून सर्व आक्षेपार्ह मजकूर हटवत नाही तोपर्यंत विकिपीडिया पाकिस्तानमध्ये ब्लॉक करण्यात येणार आहे.

ईशनिंदा हा पाकिस्तानमधील अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे. पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच एखाद्या मीडियाला अशा प्रकारच्या समस्येला सामोरे जावे लागण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वीही पाकिस्तानमध्ये अनेक यूट्यूब चॅनल ब्लॉक करण्यात आले आहेत. २०१२ ते २०१६ पर्यंत पाकिस्तानने देशात यूट्यूबवर बंदी घातली होती. यामागे पैगंबर मोहम्मद यांच्यावर बनवलेला चित्रपट होता. अलीकडेच पाकिस्तानने प्रसिद्ध टिक-टॉक अॅपवर बंदी घातली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -