Wednesday, June 7, 2023
27 C
Mumbai
घर क्राइम गुजरातच्या समुद्रात पाकिस्तानी बोटीतून 350 कोटींचे 50 किलो ड्रग्ज जप्त; 6 जणांना...

गुजरातच्या समुद्रात पाकिस्तानी बोटीतून 350 कोटींचे 50 किलो ड्रग्ज जप्त; 6 जणांना अटक

Subscribe

गुजरातच्या समुद्रात पाकिस्तानी बोटीतून 50 किलो ड्रग्ज जप्त केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएस यांनी ही ड्रग्ज जप्तीची कारवाई केली. या 50 किलो हेरॉईन ड्रग्जची किंमत 350 कोटी रुपये असल्याची माहिती मिळते.

गुजरातच्या समुद्रात पाकिस्तानी बोटीतून 50 किलो ड्रग्ज जप्त केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएस यांनी ही ड्रग्ज जप्तीची कारवाई केली. या 50 किलो हेरॉईन ड्रग्जची किंमत 350 कोटी रुपये असल्याची माहिती मिळते. याप्रकरणी भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने संयुक्त कारवाई करत बोटीवरील 6 जणांना अटक केली. (Pakistan boat carrying rs 350 crore worth of drugs caught by Indian coast guard Gujarat ats)

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) संयुक्त कारवाईत शनिवारी आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेजवळ 50 किलो हेरॉईन ड्रग्ज घेऊन जाणारी पाकिस्तानी बोट पकडली. पुढील तपासासाठी ही बोट जखाऊ बंदरात आणण्यात येत आहे.

- Advertisement -

खराब हवामानानंतरही गुजरात एटीएससह आयसीजीने हे मिशन पूर्ण केल्याचे सांगितले जात आहे. या बोट आणि ड्रग्जशी संबंधित अधिक माहितीसाठी एजन्सीने तपास सुरू केला आहे.

दरम्यान, गेल्या एका वर्षात भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात दहशतवादविरोधी पथकासोबतची ही सहावी कारवाई आहे. त्याशिवाय, ICG ने ड्रग्जने भरलेली बोट पकडण्याची एका महिन्यापेक्षा कमी कालावधीतील ही दुसरी घटना आहे.

- Advertisement -

याआधी 14 सप्टेंबर रोजी पाकिस्तानी बोटीतून सुमारे 200 कोटी रुपयांचे 40 किलो हेरॉईन एफएम पकडण्यात आले होते. एवढेच नाही तर यादरम्यान ६ जणांना अटक करण्यात आली. जे पाकिस्तानी असल्याचे सांगण्यात आले. कोचीमध्ये यापूर्वी NCB आणि ICG ने मिळून एक पाकिस्तानी बोट पकडली होती. ज्यामध्ये करोडोंचे ड्रग्ज होते.

शुक्रवारी एनसीबीने मुंबईतील एका गोडाऊनमधून 50 किलो ‘मेफेड्रोन’ (अमली पदार्थ) जप्त केले, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 120 कोटी रुपये किंमत आहे. याप्रकरणी एनसीबीने ‘एअर इंडिया’च्या माजी पायलटसह दोघांना अटक केली होती.


हेही वाचा – नाशिक बस अपघात : मृत आणि जखमींची ओळख पटली; पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -