
Bus Accident in Pakistan: पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात रविवारी वेगवान प्रवासी बस पुलाच्या खांबावर आदळल्याने आणि दरीत कोसळून बसमधील किमान ३९ जण ठार झाले. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, किमान ४८ प्रवाशांना घेऊन ही बस बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटा येथून सिंध प्रांताची राजधानी आणि मुख्य शहर कराचीला जात होती. बस पुलावरील खांबावर आदळली आणि खड्ड्यात पडल्याने पेट घेतला.
लसबेलाचे सहाय्यक आयुक्त हमजा अंजुम यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, लसबेला परिसरात अतिवेगाने हा अपघात झाला. “लासबेलाजवळ यू-टर्न घेत असताना, बस पुलाच्या खांबाला धडकली, दरीत पडली आणि नंतर आग लागली,” तो म्हणाला. अधिकाऱ्याने सांगितले की, एक लहान मूल आणि एका महिलेसह केवळ तीन जणांना जिवंत वाचवता आले. अपघातात जीव गमावणाऱ्यांची संख्या वाढू शकते असे त्यांनी सांगितले.
40 dead as passenger coach fell in ditch at Bela Balochistan. Accident occurred due to over speeding. The bus was coming from Quetta to Karachi. Bus caught fire after the accident. pic.twitter.com/3ruWaR0nGU
— Thinking Of Karachi (@ThinkingKarachi) January 29, 2023
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आणि बचाव अधिकारी मृतदेह बाहेर काढण्याचे आणि जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्याचे काम सुरू आहे.