घरदेश-विदेशपाककडून गुरूनानक यांच्या ५५० व्या 'प्रकाशपर्वा'निमित्त नाण्याचं अनावरण

पाककडून गुरूनानक यांच्या ५५० व्या ‘प्रकाशपर्वा’निमित्त नाण्याचं अनावरण

Subscribe

प्रधानमंत्री इमरान खानने फेसबुकवर या अनावरण झालेल्या नव्या चांदीच्या नाण्याचा फोटो केला शेअर

पाकिस्तानच्या सरकारने बुधवारी गुरूनानक यांच्या ५५० व्या प्रकाश पर्वानिमित्त चांदीच्या नाण्याचे अनावरण केले आहे. ५० रूपये मूल्य असणाऱ्या या विशेष नाण्याला करतारपूरमध्ये दरबारात येणाऱ्या श्रद्धाळू भाविकांना देण्यात येणार आहे. या चांदीच्या नाण्यावर ५५० जयंती उत्सव तसेच श्री गुरू नानक देव जी १४६९ – २०१९ असे साल नमूद केले आहे. तसेच दुसऱ्या नाण्यावर हेच उर्दु भाषेत कोरले आहे. या नाण्याचे मूल्य देखील ५० रूपये आहे.

- Advertisement -

गुरूनानक यांचा जन्म पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील ननकाना साहिबमध्ये १४६९ साली झाला होता. यावर्षी १२ नोव्हेंबरला गुरू नानक यांचे ५५० प्रकाश पर्व साजरा करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री इमरान खानने फेसबुकवर या अनावरण झालेल्या नव्या चांदीच्या नाण्याचा फोटो शेअर केला आहे.

- Advertisement -

पाकिस्तानकडून इमरान खान आणि भारताकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ९ नोव्हेंबर रोजी करतारपूर कॉरिडोरचे उद्घाटन करणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -