Maharashtra Assembly Election 2024
घरक्राइमPakistan Crime News : सासूनेच केली गर्भवती सुनेची हत्या, तुकडे करून नाल्यात...

Pakistan Crime News : सासूनेच केली गर्भवती सुनेची हत्या, तुकडे करून नाल्यात फेकला मृतदेह

Subscribe

एका पोलीस अधिकाऱ्याची मुलगी असलेल्या झारा हिचा विवाह चार वर्षांपूर्वी कादिर अहमदसोबत झाला होता. त्यांना तीन वर्षांचा मुलगा आहे. कादिर अहमद सौदी अरबमध्ये नोकरी करत होता. म्हणून लग्नानंतर ती सौदी अरबला गेली होती. काही महिन्यांपूर्वी ती पाकिस्तानात परतली होती.

(Pakistan Crime News) लाहोर : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तिथे सासूनेच आपल्या गर्भवती सुनेची हत्या केली. त्यानंतर आपल्या तीन साथीदारांसह तिने मृतदेहाचे अनेक तुकडे केले आणि नाल्यात फेकल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी चारही संशयितांना अटक करण्यात आली आहे. (Mother-in-law and three others arrested for killing a pregnant woman)

लाहोरपासून 100 किमी अंतरावर असलेल्या सियालकोट जिल्ह्यातील दासका येथे गेल्या आठवड्यात ही घटना घडली. त्याची माहिती पोलिसांनी अलीकडेच दिली. झारा कादिर (20) ही गेल्या आठवड्यात बेपत्ता झाली होती. त्याचदरम्यान पोलिसांना तीन गोण्यांमध्ये एका महिलेचे तुकडे सापडले. त्याच्या तपासात ती महिला झारा असल्याचे स्पष्ट झाले. झाराची सासू सुघरान बीबी, तिची मुलगी यास्मिन, तिचा नातू हमजा आणि दूरचा नातेवाईक नावेद यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

एका पोलीस अधिकाऱ्याची मुलगी असलेल्या झारा हिचा विवाह चार वर्षांपूर्वी कादिर अहमदसोबत झाला होता. त्यांना तीन वर्षांचा मुलगा आहे. कादिर अहमद सौदी अरबमध्ये नोकरी करत होता. म्हणून लग्नानंतर ती सौदी अरबला गेली होती. काही महिन्यांपूर्वी ती पाकिस्तानात परतली होती. मात्र, त्यानंतर तिची हत्या झाली. संशयितांनी झाराची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याची कबुली दिली असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी उमर फारूख यांनी सांगितले.

- Advertisement -

केवळ ईर्षेमुळेच नव्हे तर, द्वेषातूनही झाराची हत्या आणि तिचे तुकडे करण्यात आल्याचे चौकशीतून समोर आले. कादिरने आईऐवजी थेट झाराच्या बँक खात्यात पैसे पाठवण्यास सुरुवात केली होती. झारा दिसायला चांगली असल्याने कादिर तिचा शब्द पडू देत नव्हताआणि इतरांकडे दुर्लक्ष केले, असे सुघरान आणि यास्मिन यांना वाटत होते. एकूणच, झारा कथितरीत्या ‘जादूटोणा’ करत असल्याचा संशय होता, अशी कबुली सुघरान बीबीने दिली आहे.

झारा झोपलेली असताना चार संशयितांनी उशीने तोंड दाबून तिची हत्या केली. यानंतरही त्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी तिचा चेहरा जाळला. तिच्या शरीराचे तुकडे केले आणि नंतर तीन गोण्यांमध्ये भरून ते नाल्यात फेकले. झारा बेपत्ता झाल्यावर तिच्या वडिलांनी सुघरानवर संशय व्यक्त केला होता. झाराचे वडील आणि सुघरान हे भाऊ-बहीण आहेत. (Pakistan Crime News : Mother-in-law and three others arrested for killing a pregnant woman)

हेही वाचा – PM Modi : पंतप्रधान विमानात चढताना मला प्रत्येक पायरीवर एक-एक मृतदेह दिसत होता; मोदींच्या दौऱ्यावर दानवेंची टीका


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -