घरदेश-विदेशपाकिस्तानचे तीन दहशतवादी मोड्यूल उद्ध्वस्त; 6 दहशतवाद्यांसह शस्त्रसाठा जप्त

पाकिस्तानचे तीन दहशतवादी मोड्यूल उद्ध्वस्त; 6 दहशतवाद्यांसह शस्त्रसाठा जप्त

Subscribe

पाकिस्तानकडून ड्रोनच्या मदतीने शस्त्र भारतात आणून मोठे हल्ले करणारे तीन दहशतवादी मोड्यूल उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. जम्मू आणि राजोरी येथून सह दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मोठ्याप्रमाणात स्फोटके, शस्त्रे आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी एक जम्मूमधील खाटीका तलावाजवळ येथील दोन सांबा आणि कठुआ येथील तर तीन जण राजोरी जिल्ह्यातील आहेत. यात जम्मूच्या खाटीका तलावाजवळ राहणाऱ्या एका दहशतवाद्याकडून पोलिसांनी छापेमारी करत मोठ्याप्रमाणात शस्त्र साठा जप्त केला आहे.

एडीजीपी मुकेश सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दीड वर्षांपासून जम्मू विभागात ड्रोनद्वारे शस्त्रे, आयईडी आणि स्टिकी बॉम्ब पाठवण्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. यात जम्मूमधील राजोरी, उधमपूर आणि सुंजवान येथे आयईडी स्फोट आणि दहशतवादी हल्ले झाले. या सर्व घातपातांचा पोलिसांकडून तपास सुरु होता. यावेळी तपासादरम्यान तीन दहशतवादी मॉड्यूल उघडकीस आले असून ते उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.

- Advertisement -

लष्कर- ए-तोयब्बा या दहशतवादी संघटनेसाठी काम करणारा दहशतवादी बशीर सिजान हा डोडा येथील रहिवासी असून तो पाकिस्तानातून आपली सूत्र हलवत होता. यासोबत आणखी एक दहशतवादी होता ज्याचे कोड नेम अल्बर्ट असे आहे, या दोघांनी मिळून जम्मू शहरातील सांबा आणि कठुआ येथे दहशतवादी मॉड्यूल तयार केले होते. ज्याची जबाबदारी जम्मूमधील खाटीका तलावाजवळ राहणाऱ्या लष्कर दहशतवादी फैजल मुनीरवर होती. आतापर्यंत मुनीरने 15 वेळा ड्रोनद्वारे शस्त्रे घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवली आहेत. या मॉड्युलमध्ये मुनीरसह 5 दहशतवादी असून त्यापैकी 2 जणांना अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेले दहशतवादी सांबा आणि कठुआ येथील रहिवासी आहेत. हबीब आणि मियाँ सुहेल अशी त्यांची नावे आहेत. सन 2000 मध्ये जम्मूतील हरिसिंग स्कूलमधील अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या आत्मघातकी हल्ला फैजल मुनीरचा सहभाग होता. ज्यात दोषी आढळल्यावर त्याला शिक्षा झाली मात्र जामिनावर तो सुटला. गेल्या 2 वर्षांपासून तो पुन्हा दहशतवादी संघटनेशी जोडला गेला आणि त्यांच्यासोबत काम करू लागला. दीड वर्षापासून फैजलला कठुआ आणि सांबामध्ये पाकिस्तानकडून 15 ड्रोन शस्त्रे आणि स्फोटके पुरवण्यात आली जी त्याने काश्मीरमध्ये पोहोचवली.

- Advertisement -

स्टिकी बॉम्ब आणि ग्रेनेड जप्त

पोलिसांनी मुनीरच्या घरावर छापेमारी करत येथून एक एके 47, 5 पिस्तूल, 8 ग्रेनेड आणि एक स्केल जप्त केल्या आहेत.. गेल्या वर्षी श्रीनगरमध्ये जप्त केलेली 15 पिस्तूलही फैजलने कठुआ येथून ड्रोनद्वारे खरेदी केली होती, जी त्याने श्रीनगरला पाठवली होती.

फैजल घातपातासाठी वापरण्यात येणारी सर्व शस्त्रे जम्मू, सांबा आणि कठुआमध्ये ड्रोनद्वारे घेत होता. याप्रकरणी उर्वरित तीन दहशतवाद्यांचा पोलीस शोध घेत आहेत. ड्रोनच्या माध्यमातून त्यांना पैशांची पाकिटेही मिळायची. फैजलकडून एक स्विफ्ट कारही जप्त करण्यात आली आहे, जी त्याने दहशतवादी कटासाठी वापरली होती.

माहूर, रियासी येथे राहणारा दहशतवादी कासिम याने राजोरी जिल्ह्यात दोन मॉड्यूल तयार केले. ज्यावर राजोरी येथील हल्ल्याची जबाबदारी देण्यात आली होती. एका मॉड्युल राजोरीच्या ड्रॉवरचा रहिवासी अल्ताफ हुसेन आणि दुसऱ्याची जबाबदारी रियासीमध्ये पकडलेला दहशतवादी तालिब हुसेन याला देण्यात आली. अल्ताफ हुसेनने गेल्या वर्षी राजोरी शहरातील भाजप नेते जसवीर सिंग यांच्या घरावर ग्रेनेड फेकले होते. दहशतवादी तालिब हुसेन हा पाच विविध प्रकरणांमध्ये गुन्हेगार आहे.

राजोरी येथील रहिवासी अल्ताफ आणि तालिब यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. नौशेरातील लंबाडी येथे ही शस्त्रे आणि स्फोटके पाच वेळा ड्रोनद्वारे टाकण्यात आली होती, जी शस्त्रे यांनी रिसिव्ह केली. यामध्ये 3 एके 47, 8 यूजीबीएल ग्रेनेड, 7 चायनीज ग्रेनेड, 6 पिस्तुल, 4 प्रेशर माइन, 5 रिमोट कंट्रोल आयईडी, 6 स्टिकी बॉम्ब जप्त करण्यात आले. कोट्रंका स्फोटात यापैकी तिघांचा वापर करण्यात आला होता. याशिवाय दोन आयईडीही सापडले आहेत. यामध्ये एक 5 किलो आणि दुसरा 2 किलोचा आहे.

दहशतवाद्यांना तीन प्रकारचे काम सोपवण्यात आले होते

१) पाकिस्तानातून ड्रोनद्वारे येणारी शस्त्रे आणि दारूगोळा काश्मीरपर्यंत पोहचवणे

२) दहशतवाद्यांना काश्मीरमधून जम्मू आणि जम्मू ते काश्मीरमध्ये घेऊन जाणे.

३) जम्मूमधील धार्मिक स्थळांवर, भाजप नेत्यांवर, सुरक्षा दलांवर, अल्पसंख्याकांवर स्टिकी बॉम्ब आणि ग्रेनेडने हल्ले करणे.

एडीजीपी मुकेश सिंह यांनी सांगितले की, पीर पंजालमध्ये तालिब आणि अल्ताफसोबत आणखी 4 दहशतवादी काम करत आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिस रवाना झाले आहेत. जम्मूतील दहशतवादी फैजलसोबत आणखी तीन दहशतवादी आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. गेल्या दीड वर्षात जम्मूमध्ये तब्बल 300 ड्रोनसह घातपात आणि दहशतवादी हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच लष्करचे ड्रोन नेटवर्क उद्ध्वस्त करण्यात आले आहे.


सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; ‘अग्निपथ’शी संबंधित सर्व याचिका दिल्ली हायकोर्टात वर्ग

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -