घरदेश-विदेशड्रोनच्या माध्यमातून पाकिस्तानची भारतात ड्रग्जची तस्करी

ड्रोनच्या माध्यमातून पाकिस्तानची भारतात ड्रग्जची तस्करी

Subscribe

पाकिस्तानकडून सीमावर्ती गावांमध्ये हेरॉइन या अमली पदार्थांची तस्करी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. या अगोदरही सुरक्षा दलाची नजर चुकवून अमली पदार्थांची तस्करी करण्याचे पाकिस्तानचे कारस्थान समोर आले होते. पाकिस्तानने अमली पदार्थांच्या तस्करीसाठी हायटेक कारस्थान रचले आहे. ड्रोनच्या माध्यमातून अमली पदार्थ भारतीय सीमेत धाडले जात आहेत.

सुरक्षा दलांच्या नजरेस पडताच ड्रोन पाकिस्तानच्या हद्दीत
पाकिस्तानातून ड्रग्जची होणारी तस्करी चिंतेची बाब आहे. पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या राज्यांमधील काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर तस्करी होत आहे. त्याचबरोबर पंजाबमधील अबोहर, फिरोझपूर, अमृतसर आणि गुरुदासपूर जिल्ह्यांमध्ये ड्रग्जची तस्करी केली जात असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली होती. गुरुदासपूरमधील सीमेला लागून असलेल्या गावामध्ये काही दिवसांपूर्वी असाच एक प्रकार समोर आला होता. त्यावेळी प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळलेले ड्रग्ज घेऊन जमिनीपासून २०० मीटरपर्यंत उंच उडू शकणारे एक ड्रोन भारताच्या हद्दीत घुसले. मात्र सुरक्षा दलांच्या नजरेस पडताच हे ड्रोन ड्रग्ज न टाकताच पाकिस्तानच्या हद्दीत परत गेले.

- Advertisement -

या अगोदर नद्यांमधून केली जात होती तस्करी – बीएसएफ अधिकारी
बीएसएफचे वरिष्ठ अधिकारी यांनी सांगितले की, “ड्रोनच्या माध्यमातून ड्रग्जची तस्करी करण्याचा हा एक नवा पर्याय पाकिस्तानने शोधून काढला आहे. या अगोदरही सीमावर्ती राज्यांमध्ये ड्रग्जची तस्करी पाकिस्तान सराईत स्कूबा डायव्हर्सच्या मदतीने सतलज आणि रावी नदीमधून भारतात करत असे.”

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -