
पाकिस्तानची आताची परिस्थिती फार वाईट आहे. कोणत्याही लोकशाही असलेल्या देशासाठी संविधान फार महत्वाचं असतं. परंतु पाकिस्तानची जनता तिथल्या आर्मीवर हल्ला करतेय. पाकिस्तानचे पंतप्रधान सार्वजनिकरित्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. ते म्हतायत की न्यायालय विकली गेली आहेत आणि ती सरकारविरोधी झाली आहेत. त्यामुळे देशाचे जे हे तीन स्तंभ आहेत ज्यांनी मिळून काम करायला हवं, ते सेना, सरकार आणि न्यायव्यवस्था तीनही एकमेकांविरोधात बोलत आहेत. त्यामुळे पाकिस्तानचं संविधान डळमळू लागलं आहे. ( Pakistan Economic Crisis America and China will confiscate Pakistan s nuclear weapons )
सरकार, सेना आणि न्यायालय यांचं एकमेकांसोबत ताळमेळ नाही आहे त्यामुळे पाकिस्तानमध्ये जी परिस्थिती आहे ती देशाला एका विभाजनाकडे घेऊन चालली आहे.
पाकिस्तानमध्ये सेनेची जी आता अवस्था आहे ती याआधी कधीही नव्हती. जनतेने सेनेविरोधात इतकं मोठं पाऊल याआधी कधीही उचललं नव्हतं. त्यामुळे पाकिस्तानची सेना कमजोर झाली आहे त्याहूनही जास्त कमजोर पाकिस्तानचं सरकार आहे तर न्यायव्यवस्थेवरही चारही ठिकाणांवरून शाब्दिक हल्ले सुरुच आहेत. अशी परिस्थिती असतानाच पाकिस्तान हा आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आर्थिक मंदीतून जातोय . पाकिस्तानमध्ये महागाईने सर्व रेकॉर्ड्स मोडले आहेत श्रीलंकेहूनही अत्यंत वाईट अवस्था पाकिस्तानची आहे. एप्रिल महिन्यातील पाकिस्तानचा महागाई दर 36.4 टक्के तर श्रीलंकेचा 35. 3 टक्के होता. तसंचं, पाकिस्तानचा रुपया हा ऐतिहासिकदृष्ट्या घसरला आहे अमेरिकेच्या 1 डॉलर समोर पाकिस्तानला 285 रुपये मोजावे लागत आहेत.
जागाचं पाकिस्तानावर 10 लाख करोड रुपयांचं कर्ज आहे. त्यातलं 1 लाख 72 हजार करोड रुपयांच कर्ज पाकिस्तानला या चालू वर्षात भरावं लागणार आहे आणि हे कर्ज पाकिस्तानने भरलं नाही तर पाकिस्तान दिवाळखोर घोषित होणार. याचा सर्वात मोठा फटका सेनेला बसणार कारण पैसे येणं बंद होतील आणि त्यामुळे सेना कमकुवत होईल.
आता पाकिस्तान ज्या आर्थिक संकटात आहे. त्यातून बाहेर येण्यासाठी पाकिस्तानला अमेरिका, चीनसारख्या देशांकडे मदत मागावी लागणार आणि ही मदत काही अटींवर दिली जाणार. त्यातली एक महत्वाची अट म्हणजे आण्विक शस्त्र सरेंडर करावी लागतील. त्यामुळे सेना निष्क्रिय होईल, सोबतच आण्विक शस्त्रही राहणार नाहीत. याआधीही असं झालं आहे. 1994 मध्ये युक्रेन जगातील तिसरा सर्वाधिक आण्विक शस्त्र असणारा देश होता. परंतु तिथली आर्थिक स्तिथी चांगली नव्हती. त्यांनी अमेरिका ब्रिटन कडून मदत मागितली. या देशांनी मदत देण्यासाठी जी अट ठेवली त्यात आण्विक शस्त्र नष्ट करायला लावली. आता युक्रेनकडे एकही आण्विक शस्त्र नाही. युक्रेनकडे हत्यार नसल्याने रशियाने युक्रेनवर हल्ला केला आणि त्याचे दोन तुकडे करत क्रेमिया हा वेगळा देश निर्माण केला. आताही रशिया याचं गोष्टीचा फायदा घेत युक्रेनशी युद्ध करते आहे.
आता पाकिस्तानचीदेखील युक्रेनसारखीची स्थिती आहे. त्यामुळे पाकिस्तानचे चार तुकडे होणार, असं बोलल जातं आहे. अमेरिका थिंक टॅंकमध्ये पाकिस्तानचे चार तुकडे होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
( हेही वाचा: जगातील 10 शक्तिशाली देशांमध्ये भारत होणार सामील? G-7 आता G-10 होणार )
पाकिस्तान चार प्रांतात विभागलं गेलं आहे. सगळ्यात मोठं आहे पंजाब, सिंध, खैबर पख्तुनख्वा आणि त्यानंतर बलोचीस्तान. पाकिस्तानमधील अर्ध्या पेक्षा जास्त लोक म्हणजेच 53 टक्के लोक पंजाब प्रांतात राहतात. खैबर पख्तुनख्वामधील लोक स्वतःला अफगाणिस्तानचा हिस्सा मानतात. तर बलोचीस्तानमध्ये आधीच लढाई सुरूय. बलोचिस्तानला पाकिस्तानसोबत राहायचंच नाहीये, त्यामुळे पुढे जाऊन हा एक वेगळा देश बनू शकतो. सिंध हा पाकिस्तानचा तो भाग आहे जिथे हिंदू लोक जास्त प्रमाणात आहेत. अनेकदा हा एक वेगळा देश निर्माण करण्याची मागणी केली जाते. त्यामुळे हाही भाग पाकिस्तानपासून वेगळा होऊ शकतो. असं झालं तर पाकिस्तान केवळ पंजाब पर्यंतच मर्यादित राहणार आणि हे इम्रान खान स्वत:च एका मुलाखतीत म्हणाले आहेत. त्यामुळे पाकिस्तानचे लवकरच चार तुकडे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.