घरताज्या घडामोडीपरकीय चलनाचा साठा संपला; पाकिस्तानवरील आर्थिक संकट आणखी गडद होणार

परकीय चलनाचा साठा संपला; पाकिस्तानवरील आर्थिक संकट आणखी गडद होणार

Subscribe

मागील अनेक महिन्यांपासून सातत्याने पाकिस्तानातील महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढत्या महागाईमुळे आर्थिक संकटाचा सामना करणे पाकिस्तानला कठीण जात आहे. अशातच पाकिस्तानकडे फक्त ३.१६ अब्ज डॉलरचा परकीय चलन साठा शिल्लक आहे.

मागील अनेक महिन्यांपासून सातत्याने पाकिस्तानातील महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढत्या महागाईमुळे आर्थिक संकटाचा सामना करणे पाकिस्तानला कठीण जात आहे. अशातच पाकिस्तानकडे फक्त ३.१६ अब्ज डॉलरचा परकीय चलन साठा शिल्लक आहे. त्यामुळे पाकिस्तानवरील आर्थिक संकट आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Pakistan economic crisis foreign exchange reserves empty Suzuki motors shut down the factory locks on many big companies in Pakistan)

पाकिस्तानकडे आयात करण्यासाठी पैसे नाहीत. देशात कच्च्या मालाचा तुटवडा आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, पाकिस्तानमधील सुझुकी मोटर कॉर्पने २ फेब्रुवारी रोजी आपले स्थानिक युनिट आधीच बंद केले आहे. तसेच, टायर-ट्यूब बनवणाऱ्या गांधार टायर अँड रबर कंपनीने १३ फेब्रुवारीला प्लांट बंद केला. शिवाय खते, पोलाद आणि कापड बनवणाऱ्या कंपन्यांनी उत्पादन कायमचे बंद केले आहे.

- Advertisement -

कच्च्या तेलाच्या कमतरतेमुळे येथे उत्पादन थांबले होते. परकीय चलनाच्या तुटवड्यामुळे पाकिस्तानकडून कच्चे तेल विकत घेण्यासाठी पैसेच शिल्लक नव्हते. मात्र, नंतर कच्च्या तेलाचा पुरवठा झाल्यानंतर येथे पुन्हा उत्पादन सुरू करण्यात आले.

याआधी पाकिस्तानमध्ये अनेक मोठ्या कंपन्या बंद झाल्या असून, त्यांचे उत्पादनही बंद करण्यात आले आहे. त्यामध्ये मिल्लत ट्रॅक्टर्स लिमिटेड, ऍग्रो फर्टिलायझर्स लिमिटेड, GSK Plc चे पाकिस्तान युनिट, फौजी फर्टिलायझर्स बिन कासिम लिमिटेड, अमरेली स्टील्स लिमिटेड आणि निशात चुनियान लिमिटेड इत्यादींचा समावेश आहे.

- Advertisement -

पाकिस्तानात डाळ, पीठ, तेल आणि इंधनाच्या किंमती महागल्या आहेत. सर्वात मोठ्या रिफायनरी बंद झाली आहे. कच्च्या मालाच्या किमतीत सातत्याने होणारी वाढ आणि आर्थिक संकटामुळे पाकिस्तानातील अनेक बड्या कंपन्या बंद करण्यात आल्या आहेत.


हेही वाचा – मला गुंड बोलण्याचा अधिकार कोणी दिला? राजा ठाकूर राऊतांवर ठोकणार अब्रुनुकसानीचा दावा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -