घरदेश-विदेशपाकिस्तानातील निवडणुकांचा आज निकाल;इम्रान खान पंतप्रधान?

पाकिस्तानातील निवडणुकांचा आज निकाल;इम्रान खान पंतप्रधान?

Subscribe

पाकिस्तानमध्ये मतमोजणीला सुरूवात झाली आहे. आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालावरून इम्रान खान यांच्या तेहरीक - ए - इन्साफ पक्षाला सर्वाधिक जागांवर आघाडी मिळाली आहे.

पाकिस्तानमध्ये बुधवारी सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. आज सकाळी ६.४५ वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली असून इम्रान खान यांच्या तेहरीक – ए – इन्साफ पक्षाला आघाडी मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालावरून इम्रान खान यांच्या पक्षाला सर्वाधिक जागांवर आघाडी मिळाली आहे. त्यानंतर नवाज शरीफ यांचा पक्ष आघाडीवर आहे. बुधवारी मतदान झाल्यानंतर निवडणूक कल चाचणीमध्ये देखील इम्रान खान यांच्या पक्षाला सत्ता मिळणार असे आकडेवारी वरून स्पष्ट झाले आहे. तेहरीक – ए – इन्साफ पक्षाला लष्कराचा पाठिंबा आहे. त्यामुळे माजी क्रिकेटर इम्रान खान आता पाकच्या पंतप्रधानपदी असणार का? यावर काही वेळातच शिक्कामोर्तब होईल.

किती उमेदवार रिंगणात?

पाकिस्तानातील निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार नॅशनल असेंब्लीच्या २७२ जागांसाठी ३४५९ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तर चार प्रांतिक असेंब्लींच्या ५७७ जागांसाठी ८३९६ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक पूर्व झालेल्या चाचण्यांमध्ये माजी क्रिकेटर इम्रान खानच्या तेहरीक – ए – इन्साफ पक्षाला सत्ता मिळण्याचा अंदाज वर्तवला गेला होता. पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रिंगणामध्ये माजी पंतप्रधान नवाज शरीफ, पाकिस्तानचा माजी क्रिकेटर इमरान खान, माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांचा मुलगा बिलावल भुत्तो आणि कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी हाफीज सईद देखील निवडणुकीच्या रिंगणार उतरले आहे. त्यामुळे पाकिस्तानची जनता कुणाच्या पदरात मत टाकते याकडे याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. बिलावल भुत्तो याने देखील भावनिक आवाहन करत निवडणूक प्रचार केला. तर, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. अटक होणार याची कल्पना असल्यानंतर देखील नवाज शरीफ आपल्या मुलीसह पाकिस्तानात दाखल झाले. त्याच्या या कृतीकडे आता पाकिस्तानची जनता कशा प्रकारे पाहते हे निवडणुकीच्या निकालाअंती कळेल. शिवाय पाकिस्तानचा पंतप्रधान कोण यावर काही वेळातच शिक्कामोर्तब होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -