Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश पाकिस्तानने तालिबानचा मार्ग अवलंबला; महिला शिक्षकांना जीन्स घालण्यावर घातली बंदी!

पाकिस्तानने तालिबानचा मार्ग अवलंबला; महिला शिक्षकांना जीन्स घालण्यावर घातली बंदी!

Related Story

- Advertisement -

तालिबानप्रमाणेच पाकिस्ताननेही महिला आणि पुरुषांच्या कपड्यांवर बंदी घालण्यास सुरुवात केली आहे. डॉनने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या फेडरल डायरेक्टोरेट ऑफ एज्युकेशन (FDE) ने महिला शिक्षकांना जीन्स आणि घट्ट कपडे घालण्यावर बंदी घालणारी अधिसूचना जारी केली आहे. याशिवाय पुरुषांच्या कपड्यांवरही बंदी घालण्यात आली आहे. डॉन न्यूजच्या अहवालानुसार, या संदर्भात शिक्षण संचालकांनी सोमवारी शाळा आणि महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात मुख्याध्यापकांना असे सांगण्यात आले की, प्रत्येक कर्मचाऱ्याकडून नीट कपडे घातले गेले पाहिजे जेणेकरून समाजात एक चांगला संदेश पोहोचू शकेल. नियमित केस कापणे, दाढी करणे, नखे कापणे, परफ्यूम वापरणे यासारख्या चांगल्या उपायांबद्दलही या पत्रात म्हटले आहे.

इम्रान खान यांच्या ‘नव्या पाकिस्तान’ मध्ये आणखी एक तालिबान फरमान जाहीर करण्यात आले आहे, ज्यामध्ये बलात्काराला महिलांच्या कपड्यांशी जोडण्यात आले आहे. पाकिस्तानच्या फेडरल डायरेक्टोरेट ऑफ एज्युकेशन (FDE) ने महिला शिक्षकांना जीन्स घालण्यास बंदी घातली आहे. FDE ने एक अधिसूचना जारी केली असून महिला शिक्षकांना जीन्स आणि घट्ट कपडे घालण्यावर बंदी घातली आहे. त्याचबरोबर पुरुष शिक्षकांवरही अशी बंदी घालण्यात आली आहे. ते जीन्स आणि टी-शर्ट घालून शाळेत आणि महाविद्यालयात प्रवेश करू शकणार नाहीत.

- Advertisement -

‘एक्सप्रेस ट्रिब्युनल’च्या माहितीनुसार, या संदर्भात शिक्षण संचालकांनी सोमवारी शाळा आणि महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात, त्यांना असे सांगितले गेले की, कर्मचारी, प्रत्येक सदस्याने चांगले कपडे घातले पाहिजे आणि स्वतःला चांगले सादर केले. या तालिबानी हुकमांबाबत शिक्षकांमध्ये संताप आणि नाराजीचे वातावरण आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या शिक्षण विभागाच्या मते, संशोधनादरम्यान आम्हाला असे आढळले आहे की, लोकांच्या विचारांवर ड्रेस, पेहरावाचा प्रभाव सर्वात जास्त असतो. त्यामुळे त्याचा सर्वप्रथम परिणाम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वावर होतो. त्यामुळे असा निर्णय घेण्यात आला आहे की, आतापासून महिला शिक्षकांना जीन्स येणार नाही. पुरुष शिक्षकांना जीन्स आणि टी-शर्ट घालण्यास बंदी घातली आहे.


 

- Advertisement -