घरताज्या घडामोडीलादेन मेला असला तरी गुजरातचा कसाई जिवंत.., पाकिस्तानी मंत्र्याचं वादग्रस्त विधान

लादेन मेला असला तरी गुजरातचा कसाई जिवंत.., पाकिस्तानी मंत्र्याचं वादग्रस्त विधान

Subscribe

पाकिस्तानच्या मंत्र्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ९/११ चा मास्टरमाइंड ओसामा बिन लादेनला आश्रय देणारा देश या भारताकडून करण्यात आलेल्या विधानाला उत्तर देताना पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ओसामा बिन लादेन मेला आहे, हे मी भारताला सांगू इच्छितो, पण गुजरातचा कसाई जिवंत आहे आणि तो भारताचा पंतप्रधान आहे, असं वादग्रस्त विधान पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी केलं आहे.

काय म्हणाले बिलावल भुट्टो?

- Advertisement -

ओसामा बिन लादेन मेला आहे, हे मी भारताला सांगू इच्छितो, पण गुजरातचा कसाई जिवंत आहे आणि तो भारताचा पंतप्रधान आहे. मोदी पंतप्रधान होईपर्यंत त्यांच्यावर अमेरिकेत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली होती. हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पंतप्रधान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परराष्ट्रमंत्री आहेत, असं बिलावल भुट्टो यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

बिलावल भुट्टो संयुक्त राष्ट्रांच्या बैठकांना उपस्थित राहण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये आहेत. बिलावल भुट्टो यांच्या वक्तव्याविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी दिल्लीत पाकिस्तान उच्चायुक्तालयासमोर आंदोलन केलं. या आंदोलनासाठी मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उच्चायुक्तालयासमोर उपस्थित होते.


हेही वाचा : १८ पैकी १७ जागा भाजपच्या ताब्यात, बीड कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपचा मोठा विजय


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -