घरदेश-विदेशपाकिस्तानच्या माजी खासदाराची गोळ्या झाडून हत्या

पाकिस्तानच्या माजी खासदाराची गोळ्या झाडून हत्या

Subscribe

पाकिस्तानचे माजी खासदार सैय्यद अली रजा अबिद यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. सैय्यद यांच्या घराबाहेरच अज्ञात बंदूकधारांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. कराची शहरामध्ये नेत्यांवर हल्ल्याची ही ताजीच घटना आहे. पाकिस्तानच्या प्रसिध्द वृत्तपत्र डॉनने दिलेल्या माहितीनुसार, एका बाईकवरुन आलेल्या दोन बंदूकधाऱ्यांनी त्यांच्यावर थेट गोळीबार केला. मुताहिदा कौमी मूवमेंट (एमक्यूएम) चे माजी खासदार यांच्यावर गोळ्या झाडून हत्या केली.

माजी खासदारावर घराबाहेर हल्ला 

सैय्यद अली रजा अबिद यांच्या ख्याबान-ए-गाजी येथे असलेल्या घराबाहेर त्यांची मंगळवारी रात्री गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ४६ वर्षाचे सैय्यद अली रजा अबिद यांना जवळून गोळी मारण्यात आली. हल्ल्याच्या वेळी ते कारमध्ये एकटेच होते. जखमी झालेल्या सैय्यद यांना ताबडतोब जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आले आहे की, सैय्यद यांच्यावर ४ गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. सैय्यद यांची हत्या कोणी आणि का केली याचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -