घरदेश-विदेशइम्रान खान यांच्या अडचणीत वाढ, तोशखाना आणि अल कादिर ट्रस्ट प्रकरणात...

इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ, तोशखाना आणि अल कादिर ट्रस्ट प्रकरणात अटक

Subscribe

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गुप्तचर कागदपत्रे सार्वजनिक केल्याप्रकरणी इम्रान खान यांना आधीच तुरूंगात बंद आहेत. पाकिस्तानच्या सर्वोच्च भ्रष्टाचारविरोधी एजन्सी नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोनेही इम्रान खान यांना अल कादिर ट्रस्ट आणि तोशाखाना प्रकरणात अटक केली आहे.

सोमवारी नॅशनल अकाउंटेबिलीटी ब्युरो कोर्टाने न्यायाधीश मोहम्मद बशीर यांनी इम्रान खान यांच्या अटकेसाठी अटक वॉरंट जारी केले. रावळपिंडीच्या अदियाला तुरूंगात बंद असलेल्या इम्रान खानला अटक करण्यात आली. पाकिस्तानच्या मीडियानुसार, या अटकेचा अर्थ असा आहे की, इम्रान खान यांची तुरूंगात दोन्ही प्रकणाची चौकशी केली जाणार आहे.

- Advertisement -

इमरान खान यांना गुप्तचर कागदपत्रे सार्वजनिक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. पाकिस्तानच्या सर्वोच्य न्यायालयाने एका पाकिस्तानी मालमत्ता व्यावसायिकाला ४५० अब्ज रूपयांचा दंड ठोठावला आहे. इम्रान खान यांच्यावर  आरोप आहे की दंडाची रक्कम जमा करण्याऐवजी इम्रान खान यांनी दंडाच्या रकमेशी तडजोड केली आणि त्या बदल्यात व्यावसायिकाने इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांनी स्थापन केलेल्या अल कादिर ट्रस्टला सुमारे ५७ एकर जमीन भेट दिली.

इम्रान खान यांना तोशाखाना प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. या प्रकणामध्ये त्यांना जामीन मिळाला असला तरी पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने हे प्रकरण नोंदवले आहे. इम्रान खान यांनी प्रतिज्ञापत्रात तोशाखान्यातून विकल्या गेलेल्या भेटवस्तूंमधून मिळालेल्या रकमेची माहिती दिली नसल्याचा आरोप आहे. इम्रान खान यांना विरोधात अटक वॉरंट जारी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने इम्रान खान यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -