घरताज्या घडामोडीPakistan : इम्रान खान यांच्या निवासस्थानाला पोलिसांनी घेरले; दहशतवादी लपल्याची माहिती

Pakistan : इम्रान खान यांच्या निवासस्थानाला पोलिसांनी घेरले; दहशतवादी लपल्याची माहिती

Subscribe

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या लाहोर येथील घराला पोलिसांनी घेराव घातला आहे. इम्रान खानच्या घरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्याचा पोलिसांचा दावा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लाहोरच्या जमान पार्कमध्ये इम्रान खान यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस जमा झाले आहेत.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या लाहोर येथील घराला पोलिसांनी घेराव घातला आहे. इम्रान खानच्या घरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्याचा पोलिसांचा दावा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लाहोरच्या जमान पार्कमध्ये इम्रान खान यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस जमा झाले आहेत. इम्रान यांच्या घरात 40 दहशतवादी लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. (pakistan Former PM imran khan house surrounded by police claim input of terrorists hiding lahore)

मिळालेल्या माहितीनुसार, इम्रान खान यांच्या घराला पोलिसांनी घेराव घातल्याची माहिती मिळताच इम्रान यांचे समर्थकही त्याच्या घराबाहेर मोठ्या संख्येने जमा होऊ लागले आहेत. इम्रान यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त आणि त्याचे समर्थक जमल्याने हाणामारी होण्याची शक्यताही बळावली जात आहे.

- Advertisement -

दरम्यान, इम्रान खान यांना पाकिस्तान रेंजर्सने 9 मे रोजी न्यायालयाच्या परिसरातून अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाच्या मध्यस्थीनंतर त्यांची सुटका करण्यात आली. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने 9 मेनंतर इम्रान खान यांच्या विरोधात नोंदवलेल्या कोणत्याही प्रकरणात अटक करण्यावर बंदी घालण्याचा आदेश बुधवारपर्यंत (31 मे) वाढवला आहे.

सरकारच्या वकिलांनी इम्रान खान यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती देण्यासाठी आणखी वेळ मागितल्यानंतर उच्च न्यायालयाने ही व्यवस्था केली. सुनावणीवेळी इम्रान खान न्यायालयात हजर होते. इम्रानविरुद्ध दाखल झालेल्या सर्व खटल्यांचा तपशील मागणाऱ्या तहरीक-ए-इन्साफने (पीटीआय) दाखल केलेल्या अर्जावर कोर्टात सुनावणी सुरू होती.

- Advertisement -

पीटीआयने दावा केला आहे की त्यांच्या पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांच्याविरोधात देशभरात 100 हून अधिक खटले दाखल झाले आहेत. न्यायालयाने सरकारी वकिलाची विनंती मान्य करत सुनावणी 31 मे पर्यंत पुढे ढकलली.


हेही वाचा – ‘या’ कारणांमुळे डी.के. शिवकुमार यांची मुख्यमंत्रीपदाची संधी पुन्हा हुकण्याची शक्यता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -