घरताज्या घडामोडीपाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांची प्रकृती चिंताजनक

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांची प्रकृती चिंताजनक

Subscribe

गेल्या तीन आठवड्यांपासून ते रुग्णालयात असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली.

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांची तब्येत खालावली असल्याची माहिती समोर येत आहे. ते दुबईतील अमेरिकन रुग्णालयात उपचार घेत असून गेल्या तीन आठवड्यांपासून ते रुग्णालयात असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली.

त्यांच्या कुटुंबियांनी ट्विटरद्वारे दिलेल्या माहितीनुसार, परवेझ मुशर्रफ व्हेंटिलेटरवर नसून ते गेल्या तीन आठवड्यांपासून रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांना विविध आजारांनी जखडले असून रिकव्हरी शक्य नाही. त्यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना करा.

- Advertisement -


78 वर्षीय मुशर्रफ यांनी 1999 ते 2008 पर्यंत पाकिस्तानवर राज्य केले. मुशर्रफ मार्च 2016 पासून दुबईत राहत होते.

भारताविरोधात कारगिल युद्धातही त्यांचा मोठा हात होता. कारगिलमध्ये घुसखोरी करून विजय मिळवता येईल असं परवेज यांना वाटलं होतं, पण तसं होऊ शकलं नाही. याउलट या युद्धात अनेक पाकिस्तानी सैनिकांनी आपले प्राण गमावले. यानंतर त्यांनी भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

परवेज मुशर्रफ सहा वर्षांपूर्वी उपचारांसाठी दुबईला गेले होते. मात्र, ते तिथून परत पाकिस्तानात परतलेच नाहीत. पाकिस्तानात परतल्यावर त्यांना अटक केली जाईल, अशी त्यांना भिती होती म्हणून ते पाकिस्तानात परतले नसल्याचं सांगण्यात येतंय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -