‘त्या’ प्रकरणी इम्रान खानच्या घरावर पोलिसांनी चालवले बुलडोझर

पाकिस्तानचे माजी पंतप्रताध इम्रान खान याच्या घरावर बलडोझर चालवल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. तोशाखाना प्रकरणात कोर्टात हजर राहण्यासाठी इम्रान खान इस्लामाबादला लाहोर येथील निवासस्थानावरून निघाले.

Imran Khan

पाकिस्तानचे माजी पंतप्रताध इम्रान खान याच्या घरावर बलडोझर चालवल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. तोशाखाना प्रकरणात कोर्टात हजर राहण्यासाठी इम्रान खान इस्लामाबादला लाहोर येथील निवासस्थानावरून निघाले. त्याचवेळी पंजाब पोलिसांकडून इम्रान खान यांच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आल्याची माहिती पाकिस्तानी माध्यमांनी दिली. (Pakistan Former prime minister imran khan house break police after he leaves home)

पंजाब पोलिसांनी इम्रान खानच्या घरावर बुलडोझर चालवल्यानंतर त्यांच्या काही समर्थकांनी विरोध केला. त्यानंतर पोलिसांनी 20 जणांना अटक केली. पोलिसांच्या या कारवाईनंतर इम्रान खान यांनी संताप व्यक्त केला. तसेच, यासंदर्भात ट्वीटही केले आहे.

“माझ्या घरी पत्नी बुशरा बेगम एकटीच असून, मी घरात नसताना पोलीस कोणत्या कायद्याखाली ही मोहीम राबवत आहेत? हा लंडन योजनेचा एक भाग आहे. जिथे फरार असलेले नवाझ शरीफ यांना सत्तेत आणण्याचे प्रयत्न केले जात आहे. मला निवडणूक प्रचारापासून दूर ठेवण्याचा हा प्रयत्न आहे”, असे इम्रान खान म्हणाले.

”जामीन मिळाल्यानंतरही पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट (पीडीएम) आघाडी सरकार मला अटक करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, माझा कायद्यावर विश्वास आहे. त्यामुळे मी स्वत:हून न्यायालयात जात आहे. सरकारचा मला तुरुंगात डांबण्याचा प्रयत्न आहे. ज्यामुळे मी निवडणूक प्रचाराचे नेतृत्व करू शकत नाही”, असे इम्रान खान ट्विट करत म्हणाले.

नेमके प्रकरण काय?

तोशाखाना प्रकरणात एका महिला न्यायाधीशाला धमकावल्याबद्दल आणि कोर्टात हजर न राहिल्याबद्दल इम्रान खानविरोधात 2 अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे त्याच्यावर अनेक दिवसांपासून अटकेची टांगती तलवार आहे. यापूर्वी इस्लामाबाद पोलीस हेलिकॉप्टरमधून इम्रानला अटक करण्यासाठी पोहोचले होते. पण अत्यंत हुशारीने इम्रानने घरही सोडले आणि थेट रॅलीला संबोधित करण्यासाठी गेले. त्यामुळे समर्थकांच्या गर्दीत इम्रान खानला पकडणे पोलिसांना कठीण झाले.


हेही वाचा – पंजाबमध्ये इंटरनेट सेवा खंडित, अमृतपालप्रकरण चिघळण्याची शक्यता