पाकिस्तानातील 1200 वर्ष जुन्या वाल्मिकी मंदिराच्या जीर्णोद्धाराची शरीफ सरकारकडून घोषणा

पाकिस्तानच्या लोहारमध्ये स्थित असलेलं वाल्मिकी मंदिराच्या जीर्णोद्धाराची पाकिस्तानी सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे. काहींच्या मते काही लोकांनी या मंदिराचा अनधिकृतरित्या ताबा घेतला होता

पाकिस्तान मध्ये आज सुद्धा काही प्राचीन मंदिरं आहेत. ज्यांची योग्य काळजी घेतली गेली नसल्यामुळे त्यांची दुर्दशा झालेली आहे. परंतु ही मंदिरं आज सुद्धा हिंदू धर्मियांचं केंद्रस्थान आहेत. असचं एक मंदिर पाकिस्तानच्या लोहारमध्ये आहे. जे 1200 वर्षांपूर्वीचं आहे. दरम्यान, आता या वाल्मिकी मंदिराच्या जीर्णोद्धाराची पाकिस्तानी सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे. माहितीनुसार, या मंदिराचा काही लोकांनी अनधिकृतरित्या ताबा घेतला होता.

1200 वर्ष जुण्या वाल्मिकी मंदिराचा होणार जीर्णोद्धार
पाकिस्तानच्या लोहारमध्ये स्थित असलेलं वाल्मिकी मंदिराच्या जीर्णोद्धाराची पाकिस्तानी सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे. काहींच्या मते काही लोकांनी या मंदिराचा अनधिकृतरित्या ताबा घेतला होता. अनेक वाद-विवाद झाल्यानंतर एका संघटनेकडे या मंदिराच्या निगरानीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याआधी वाल्मिकी समाजाचे लोकचं फक्त मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी जात होते.

पौराणिक मान्यतेनुसार पाकिस्तानमध्ये स्थित असलेल्या लाहोर नगराची स्थापना प्रभु श्री राम यांचा मुलगा लव याने केली होती. याला जुन्या पंजाबची राजधानी मानले जायचे. त्यामुळे या ठिकाणाला लवपुर या नावाने देखील ओळखले जायचे.

लाहोरमधील दोन मंदिरांमध्ये होते पूजा
1200 वर्ष जुन्या मंदिरामध्ये भारत-पाकिस्तान वेगळे होण्यापूर्वी अनेक हिंदू लोक या मंदिरात जायचे. त्यावेळी इथे नियमीत पूजा केली जायची. या वाल्मिकी मंदिराव्यतिरिक्त लाहोरमध्ये श्री कृष्णाचं मंदिर देखील आहे. जिथे पूजा-अर्चना केली जाते.


हेही वाचा :बर्मिगहम कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताची चमकदार कामगिरी, पदकसंख्या 26 वर