घरताज्या घडामोडीपाकिस्तान सरकारचे ट्विटर हँडल भारतात ब्लॉक; वाचा नेमकं प्रकरण काय?

पाकिस्तान सरकारचे ट्विटर हँडल भारतात ब्लॉक; वाचा नेमकं प्रकरण काय?

Subscribe

पाकिस्तान सरकारचे ट्विटर हँडल भारतात ब्लॉक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. ट्विटरवर जारी करण्यात आलेल्या नोटिसीनुसार, कायदेशीर मागणीवरून पाकिस्तान सरकारचे ट्विटर हँडल भारतात ब्लॉक करण्यात आल्याचे समजते.

पाकिस्तान सरकारचे ट्विटर हँडल भारतात ब्लॉक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. ट्विटरवर जारी करण्यात आलेल्या नोटिसीनुसार, कायदेशीर मागणीवरून पाकिस्तान सरकारचे ट्विटर हँडल भारतात ब्लॉक करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्या नव्या वादाची शक्यता वर्तवली जात आहे. (pakistan government official twitter account in india blocked after legal demand)

ट्विटरच्या गाईडलाईन्सनुसार, न्यायालयाचा आदेश किंवा सरकारी मागणी यांसारख्या वैध कायदेशीर मागणीवर ट्विटर हँडल ब्लॉक करावे लागते. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान सरकारचे ट्विटर हँडल अमेरिका, कॅनडा इत्यादी देशांमध्ये सुरू राहणार आहे. तसेच, पाकिस्तान सरकारच्या ट्विटर हँडलवर गेल्यानंतर तिथे लिहिण्यात आले की, “भारतातील एका कायदेशीर मागणीला प्रतिसाद म्हणून पाकिस्तान सरकारचे भारतातील ट्विटर हँडल सस्पेंड करण्यात आले आहे”. मात्र, याप्रकरणी अद्याप भारत किंवा पाकिस्तानच्या माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

- Advertisement -

दरम्यान, पाकिस्तानचे ट्विटर अकाउंटवर भारतात बंदी घालण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी जुलै 2022 मध्ये, पाकिस्तान सरकारच्या ट्विटर हँडलवर भारतात बंदी घालण्यात आली होती. परंतु, नंतर ती बंदी हटवण्यात आली आणि अकाउंट भारतात पुन्हा दिसू लागले. आता पुन्हा ट्विटरने भारतात पाकिस्तान सरकारचे ट्विटर हँडल ब्लॉक केले आहे.

- Advertisement -

ट्विटर इंडियाने गतवर्षी जूनमध्ये भारतातील संयुक्त राष्ट्र, तुर्की, इराण आणि इजिप्तमधील पाकिस्तानी दूतावासांची अधिकृत ट्विटर अकाउंट ब्लॉक केली होती. यासोबतच भारताने भारतविरोधी खोटी माहिती पसरवणाऱ्या अनेक यूट्यूब चॅनल आणि फेसबुक अकाउंटवर बंदी घातली होती.


हेही वाचा – देशात कोरोनाचा धोका वाढला; WHOने जारी केल्या नव्या सूचना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -