Pakistan Crises : जनता कंगाल, खासदारांची चंगळ; सरकारकडून नेत्यांसाठी अब्जावधींचा निधी

Pakistan Crises | नुकत्याच आलेल्या एका अहवालानुसार पाकिस्तान सरकारने खासदारांच्या निधीत 90 अब्ज पाकिस्तानी रुपयांपर्यंत वाढ केली आहे.

pakistan pm

Pakistan Crises | इस्लामाबाद – आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. देशातील जनता छोट्या छोट्या गोष्टींवर अवलंबून आहे. लोक मूलभूत गरजांसाठी झगडत असताना पाकिस्तान सरकार आपल्या नेत्यांवर मेहरबानी करत आहे. नुकत्याच आलेल्या एका अहवालानुसार पाकिस्तान सरकारने खासदारांच्या निधीत 90 अब्ज पाकिस्तानी रुपयांपर्यंत वाढ केली आहे.

हेही वाचा – Breaking : पाकिस्तानात वीजपुरवठा खंडित, राजधानीसह अनेक जिल्हे अंधारात

द एक्स्प्रेस ट्रिब्यूनच्या ताज्या वृत्तानुसार, एकीकडे देश कंगाल होत असला तरीही त्या देशातील नेते मात्र गडगंज श्रीमंत होत आहेत. पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्या सरकारने खासदारांचा खर्च 90 अब्ज पाकिस्तानी रुपयांपर्यंत वाढवला आहे. यासोबतच न्यायाधीशांच्या निवासस्थानांच्या नूतनीकरणासाठी सरकारने 84 कोटींहून अधिक निधी दिला आहे. देशातील नागरिक महागाईच्या वणव्यात होरपळत असताना खासदारांवर अशी मेहेरबानी होत आहे, त्यामुळे देशातील नागरिकांसह जागतिक स्तरावर पाकिस्तान टीकेचा धनी बनत आहे.

वाचा – वकरच पाकिस्तानचे तुकडे होणार – रामदेव बाबा

रक्कम कमी करण्याऐवजी वाढवली

पाकिस्तान सरकारने हा निर्णय अशा वेळी घेतला आहे, जेव्हा देशाच्या राष्ट्रीय अर्थशास्त्र समितीने सरकारला उलट विचार करण्याची शिफारस केली होती. खासदारांच्या पगारात 15 टक्के कपात करावी आणि विवेकाधीन योजना रद्द केल्या पाहिजेत, असे समितीचे मत होते. यासोबतच पगार आणि भत्त्यांमध्ये कपात करण्याचीही शिफारस करण्यात आली होती, मात्र पाकिस्तान सरकारने याच्या विरुद्ध निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – पाकिस्तानचे लवकरच तुकडे-तुकडे, …तर भारत पीओके ताब्यात घेईल – मुक्तदर खान

पाकिस्तानची आर्थिक स्थिती इतकी बिकट आहे की देशाचा परकीय चलनाचा साठा संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. देशातील महागाईचा दर शिखरावर पोहोचला असून लोकांना जीवनावश्यक वस्तूंवरही कपात करावी लागत आहे. एवढेच नाही तर खुद्द पाकिस्तान सरकारही पैसे वाचवण्यासाठी वीज कपातीसारखे पाऊल उचलत आहे.

हेही वाचा – सख्ख्या बहिणी असल्यास एकीची शालेय फी सरकार भरणार; योगी सरकारचा मोठा निर्णय