पाकिस्तानच्या संरक्षण बजेटमध्ये वाढ, एका सैनिकावर पाक करतोय २६.५ लाख खर्च

Pakistan Govt Hike 6 percent Defence budget
पाकिस्तानच्या संरक्षण बजेटमध्ये वाढ, एका सैनिकावर पाक करतोय २६.५ लाख खर्च

पाकिस्तानची आर्थिक स्थिती ही दिवसागणिक खालावत चालली आहे. दरम्यान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानने अर्थव्यवस्थेला सुधारण्याऐवजी एक असा निर्णय घेतलाय की ज्याने संपूर्ण जग आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत आहे. प्रचंड आर्थिक डबघाईचा सामना करत असलेल्या आणि कर्जाच्या गर्तेत अडकलेल्या पाकने इस्लामाबादच्या नव्या राज्यकर्त्यांनी सरंक्षण बजेट वाढवण्याची घोषणा केलीये

पाकिस्तानचे नवनिर्वाचीत पंतप्रधान शाहबाज शरीफ सरकारच्या या निर्णयामुळे पाकिस्तानच्या लष्कर आणि इतर सशस्त्र दलांना पुढील आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात तब्बल 1 हजार 400 अब्ज रुपयांची भर झाली आहे. नुकत्याच सादर करण्यात आलेल्या बजेटमध्ये  सुमारे 83 अब्ज रुपये अधिक यावेळी देण्यात आले आहेत माहितीनुसार अर्थसंकल्पाच्या घोषणेवेळी सर्वांच्या नजरा या संरक्षण क्षेत्रासाठी देण्यात येणाऱ्या तरतूदीकडे असतात.

एका सैनिकावर वर्षाला होते 26.5 लाख खर्च

द डॉन वृत्तपत्राच्या बातमीनुसार , सशस्त्र दलासाठी पाकने 1,453 अब्ज रुपयांचे वाटप हे गेल्या वर्षीच्या 1,370     अब्ज रुपयांच्या वाटपाच्या तुलनेत सुमारे 83 अब्ज रुपये अधिक असले. यात सुमारे 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही तरदूत मुख्यत्वे संरक्षण खात्याशी संबधित कर्मचारी खर्च, पागर आणि भत्यांवर करण्यात येते असं अहवालात नमूद करण्यात आले आहे. यासह माहितीनुसार पाकिस्तान मधील प्रत्येक जवानावर होणारा वार्षिक खर्च हा 26.5 लाख रुपये असेल जो भारताच्या खर्चाच्या एक तृतीयांश भागही नाही.

पाकिस्तानी तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार या निर्णयातून पुढील आर्थिक वर्षात पाकिस्तानचे संरक्षण बजेट एकूण खर्चाच्या तब्बल 16 टक्के इतके असेल. दरम्यान सकल देशांतर्गत उत्पादनातील वाटा पाहता तो चालू वर्षामध्ये तब्बल 2.54 टक्क्यांवरुन 2.2 टक्के यावर येईल.

पाकिस्तानने संरक्षण दलाच्या बजेटमध्ये वाढ केल्यानंतरही आणि यापूर्वीही भारताकडून पाकला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. दुसरीकडे अफगाणिस्तानातील तालिबानी सैनिकांचे कडवे आव्हानही त्यांच्या सैनिकांसमोर आहेत.


हे हि वाचा –  पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या हत्येची अफवा, यंत्रणा हाय अलर्टवर