Saturday, September 18, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश अफगाणिस्तानात पाकला हस्तक्षेपाचा अधिकार नाही, पंजशीर प्रांतावर ताबा मिळवल्याचा तालिबानचा दावा

अफगाणिस्तानात पाकला हस्तक्षेपाचा अधिकार नाही, पंजशीर प्रांतावर ताबा मिळवल्याचा तालिबानचा दावा

Related Story

- Advertisement -

पाकिस्तानसह कोणत्याही देशाला अफगाणिस्तानच्या अंतर्गत व्यवहारात हस्तक्षेप करता येणार नाही, तसेच आम्ही करू करू देणार नसल्याचे तालिबानने सोमवारी सांगितले. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचे प्रमुख फैज हमीद आणि त्याचा नेता मुल्ला अब्दुल गनी बरदार यांच्यातील बैठकीबद्दल बोलताना तालिबानने हे सांगितले. यावेळी तालिबानने पंजशीर प्रांतावर ताबा मिळवल्याचा देखील दावा केला आणि असे म्हटले की, आता संपूर्ण अफगाणिस्तान त्यांच्या ताब्यात आला आहे. नॅशनल रेझिस्टन्स फ्रंट ऑफ अफगाणिस्तान जो पंजशीरमध्ये तालिबानशी युद्ध करतो, त्याने हा दावा मोडीत काढत म्हटले, प्रांतातील सर्व महत्त्वाच्या गोष्टींवर कब्जा असल्याचे सांगितले आहे.

ISI प्रमुख हमीद शनिवारी अनपेक्षितपणे काबूलमध्ये दाखल झाल्यानंतर अफगाणिस्तानच्या अंतर्गत बाबींमध्ये बाह्य हस्तक्षेपाचा प्रश्न निर्माण झाला. मात्र नव्या सरकारमधील भागीदारीवरून तालिबानच्या विविध गटांमधील मतभेद मिटवण्यासाठी हमीद आले असल्याचे म्हटले जात आहे.अफगाणिस्तानच्या वृत्तसंस्थेनुसार तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी असे म्हटले की, तालिबानी लोकं पाकिस्तानसह कोणत्याही देशाला अफगाणिस्तानच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू देणार नाही. या विजयाने आपला देश युद्धातून बाहेर आला आहे. तसेच पंजशीरच्या लोकांमध्ये कोणताही भेदभाव केला जाणार नाही.

- Advertisement -

मसूद आणि माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह शेजारच्या ताजिकिस्तानमध्ये पळ काढला होते. इंटरनेट मीडियावर अनेक फोटोही पोस्ट करण्यात आले आहेत, ज्यामध्ये तालिबानचे सदस्य पंजशीरमधील गव्हर्नर हाऊसच्या गेटवर दिसत असल्याचा दावा देखील तालिबान प्रवक्त्याने केला. दरम्यान, तालिबानच्या विजयाचा दावा खोटा आहे आणि एनआयएफए सैन्य लढत असल्याचे रॉयटर्स वृत्तसंस्थेने म्हटले आहे. यासंदर्भात मसूदने ट्विटरवर सांगितले की, ते सुरक्षित आहे. एनआरएफए नेत्यांनी अफगाणिस्तानच्या लोकांना तालिबानच्या विरोधात देशव्यापी बंड पुकारण्याचे आवाहन केले आहे.


- Advertisement -