Pak train hijack : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतमध्ये अतिरेक्यांनी मंगळवारी क्वेट्टा येथून पेशारवला जाणाऱ्या जाफर एक्स्प्रेस या प्रवासी रेल्वेगाडीवर हल्ला चढवला. पाकिस्तान, ब्रिटन आणि अमेरिकेने प्रतिबंध घातेलल्या ‘बलुचिस्तान लिबरेनशन आर्मी’ ( बीएलए ) या संघटनेने हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.
अतिरेक्यांनी कच्छी जिल्ह्यातील गुदलार आणि पिरू कोनेरी भाग यादरम्यान डोंगराळ प्रदेशातील एका बोगद्याजवळ स्फोट घडवून आणला आणि जवळपास 50० प्रवाशांना ओलीस धरले. आतापर्यंत 150 ओलिसांना वाचवण्यात सुरक्षा दलाला यश मिळाले आहे. तर, 27 अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
जाफर एक्स्प्रेस ही पाकिस्तानसाठी खूप महत्त्वाची मानली जाते. ही रेल्वे बलूचिस्तानमधील क्वेट्टाला पंजाब प्रांतातील पेशावरला जोडते. क्वेट्टामध्ये पाकिस्तानच्या आर्मीचा कॅम्प आहे. रेल्वेतून मोठ्या प्रमाणात जवान प्रवास करतात. त्यामुळे ही रेल्वे सातत्याने अतिरेक्यांच्या निशाण्यावर असते. 2018 मध्ये ‘बलुचिस्तान लिबरेनशन आर्मी’च्या अतिरेक्यांनी रिमोट कंट्रोल बॉम्बने रेल्वेला लक्ष्य केले होते. पण, रेल्वे 200 फूट लांब असतानाच बॉम्ब फुटला होता. तर, 2023 मध्ये सुद्धा रेल्वेवर एकाच ठिकाणी दोनवेळा हल्ला झालेला.
क्वेट्टातून पेशावर हे अंतर 1,632 किलोमीटरचे आहे. त्यामुळे रेल्वेला क्वेट्टातून पेशावर जाण्यासाठी 34 तास लागतात. दोन्ही स्थानकांदरम्यान रेल्वे 39 ठिकाणी थांबते. Bookme.pk या संकेतस्थळानुसार जाफर एक्स्प्रेसचे इकॉनॉमी क्लासचे तिकीट 4,350 पाकिस्तानी रूपये आहे. एसी तिकीट 8,300 पाकिस्तानी रूपये, एसी बिझनेस क्लासचे तिकीट 9,550 पाकिस्तानी रूपये आणि एसी स्लीपर क्लासचे तिकीट 13,300 पाकिस्तानी रूपये आहे.
हेही वाचा : ‘माझी गॅरंटी घेऊ नका, माझे काय खरे नाही,’ जयंत पाटलांच्या विधानाने भुवया उंचवल्या