घरदेश-विदेशPakistan : अटकेच्या कारवाईनंतर इम्रान समर्थक आक्रमक; लष्कराच्या मुख्यालयात केली तोडफोड

Pakistan : अटकेच्या कारवाईनंतर इम्रान समर्थक आक्रमक; लष्कराच्या मुख्यालयात केली तोडफोड

Subscribe

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेनंतर त्यांच्या समर्थकांकडून देशभरात जोरदार निदर्शने सुरू आहेत. त्यांच्या अटकेच्या काही तासांनंतर, पीटीआय समर्थकांनी काठ्या आणि रॉडसह लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला केला.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेनंतर त्यांच्या समर्थकांकडून देशभरात जोरदार निदर्शने सुरू आहेत. त्यांच्या अटकेच्या काही तासांनंतर, पीटीआय समर्थकांनी काठ्या आणि रॉडसह लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला केला. यावेळी त्यांनी तोडफोड करून घोषणाबाजी केली. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ठिकठिकाणी हिंसक निदर्शने होत असल्याचे लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने इस्लामाबादेत जमावबंदी लागू केली आहे. ( Pakistan Imran Khan supporters aggressive after arrest Vandalized the army headquarters with sticks )

लाहोर कॅंटमधील कॉर्प्स कमांडर हाऊसमध्ये निदर्शक जमावाने सुरक्षा कर्मचार्‍यांना त्रास दिला आणि सोबतच घोषणाबाजीही केली. कहा था ना इम्रान को मत छेडना असा नारा देत त्यांनी लष्कराच्या कार्यालयावर हल्ला केला. इम्रानचे समर्थक लष्कराच्या मुख्यालयाबाहेर मोठ्या संख्येने जमले आणि त्यांनी आवारात प्रवेश करण्यापूर्वी दगडफेक केली. लष्कराच्या मुख्यालयावर जनतेकडून हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ आहे. इम्रानच्या अटकेपासून देशाच्या अनेक भागांत हिंसक निदर्शने होत आहेत. अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. समर्थकांनी रस्त्यात टायर जाळले. प्राथमिक वृत्तानुसार पाच पोलीस अधिकारी जखमी झाले असून ४३ आंदोलकांना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो (NAB) च्या अल-कादिर ट्रस्ट प्रकरणाच्या चौकशीचा एक भाग म्हणून इस्लामाबाद उच्च न्यायालयात हजर होण्यापूर्वी पीटीआय प्रमुखाला अटक करण्यात आली आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीटीआयची सहा सदस्यीय समिती इम्रानच्या अटकेनंतर पुढची कारवाई करणार आहेत.

( हेही वाचा: कर्नाटकात उद्या मतदान; पंतप्रधानांनी पत्राद्वारे जनतेला केले आवाहन, म्हणाले… )

- Advertisement -

पक्षाचे उपाध्यक्ष आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, अटकेच्या पार्श्वभूमीवर पुढील कारवाईबाबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय नेतृत्व आणि पक्षप्रमुखांनी स्थापन केलेल्या आपत्कालीन समितीच्या सदस्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पुढील कारवाईबाबत घोषणा केली जाईल, असेही ते म्हणाले. पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले की इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी अटकेची दखल घेतली आहे आणि पक्ष पूर्ण निर्धाराने कायदेशीर आणि राजकीय लढाई लढत राहील असे सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -