घरताज्या घडामोडीPak Inflation : पाकचा भारतविरोधी हट्ट, अन् जनतेला कटिंग चायही परवडेना

Pak Inflation : पाकचा भारतविरोधी हट्ट, अन् जनतेला कटिंग चायही परवडेना

Subscribe

पाकिस्तानात सर्वसामान्यांचे महागाईने कंबरडे मोडले आहे. गेल्या एका वर्षात पाकिस्तानमध्ये महागाईने सर्वसामान्यांचे जीवन अतिशय विस्कळीत केले आहे. पाकिस्तानच्या शहरांमध्येही आता महागाईची मोठी झळ पहायला मिळत आहे. दररोज लागणाऱ्या जीवनावश्यक गोष्टींच्या दरातही या महागाईची झळ दिसून येत आहे. या महागाईचाच भडका म्हणजे पाकिस्तानात आता सर्वसामान्यांना चहाचा स्वादही मुकावा लागत आहे. भारतातून साखर आयात न करण्याचा थेट निर्णय आता पाकिस्तानच्या नागरिकांच्या साखरेच्या किंमतीवर दिसत आहे. परिणाम पाकिस्तानाच चहाचा दर चांगलाच कडाडला आहे. भारताकडून साखर आयात न करण्याचा परिणाम हा सर्वसामान्यांच्या रोजच्या जगण्यामध्ये आता दिसून येत आहे. (Pakistan inflation affects sugar import from india leads hike in tea price)

पाकिस्तानातील रावलपिंडीत सध्या साखर चांगलीच भाव खात आहे. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील चहाची चव बदलली आहे. एका चहाच्या कटिंगसाठी नागरिकांना ४० रूपये मोजावे लागत आहेत. पाकिस्तानचे मोठे वृत्तपत्र असलेल्या डॉनने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. अल्पावधीतच चहाची किंमत ही ४० रूपयांपर्यंत पोहचली आहे. चहासाठी लागणारी चहापत्ती, टी बॅग्स, दूध, साखर आणि गॅसच्या किंमतीही भडकल्याचा हा परिणाम आहे. चहाच्या किंमतीत अल्पावधीत ३५ टक्क्यांनी वाढ झाल्याचेही डॉन वृत्तपत्रातील बातमीत म्हटले आहे.

- Advertisement -

पाकिस्तानात चहा महागण्यासाठी एकटी साखरच जबाबदार नाही. चहाशी संबंधित अनेक गोष्टींच्या दरातील वाढीचा हा परिणाम दिसून आला आहे. चहाला लागणाऱ्या दुधासाठीची किंमती १०५ रूपये प्रति लिटरवरून १२० रूपये प्रति लिटर इतकी झाली आहे. तर चहापत्तीसाठी किलोसाठी ९०० रूपये मोजावे लागत आहेत. गॅस सिलेंडरच्या किंमतीतही भडका पहायला मिळाला आहे. गॅस सिलेंडरची किंमत आता १५०० रूपयांवर पोहचलेली आहे. चहाच्या किंमतीत वाढीमुळे चहाविक्रेत्यांनाही मोठा फटका बसला आहे. रोजच्या कमाईतला फायदा अवघा १५ रूपये असल्यानेच चहाची किंमत वाढवल्याची प्रतिक्रिया एका चहा विक्रेत्याने डॉन वृत्तपत्राला दिली आहे. दिवसाला २६०० रूपयांची गुंतवणुक करूनही फायदा होत नसल्यानेच किंमत वाढवल्याचे चहावाल्यांचे म्हणणे आहे.

छोट्या व्यवसायांना आणि सर्वसामान्यांना, गरीबांना या महागाईची झळ बसत आहे. चहा महागल्याने चहाच्या ग्राहकांचीचीही संख्याही कमी होत असल्याचे चहा विक्रेत्यांचे म्हणणे आहे. अनेकांनी महागाईला कंटाळून चहा पिण्याचेही सोडले असल्याचीही प्रतिक्रिया येत आहे. त्यामुळे गरीबांना या महागाईची झळ सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

पाकिस्तान सरकारच्या जिद्दीमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठी झळ बसलेली आहे. ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ पाकिस्तानच्या माध्यमातून आयात करण्यात आलेली २८ हजार ७६० मेट्रिक टन इतकी साखर पाकिस्तानात पोहचली आहे. ही साखर ११० रूपये किलोने नागरिकांना विकण्यात आली आहे. गेल्या वर्षी याच साखरेची किंमत ९० रूपये किलो ही इतकी होती. गेल्या वर्षी टीसीपीने एक लाख टन इतकी साखर आयात केली होती. तेव्हाही ही किंमत ९० लाख रूपये प्रति किलो होती. भारतीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानने मागणी केली तर भारतातून साखर दिली जाऊ शकते. तसेच साखर अतिशय स्वस्त दराने मिळू शकते असा भारतीय अधिकाऱ्यांना विश्वास वाटतो.

पाकिस्तानने यंदाच्या वर्षी एप्रिल महिन्यात भारतातून साखर आयात करण्यासाठी नकार दिला होता. पाकिस्तानने भारताच्या काश्मिरमध्ये आर्टिकल ३७० ला आक्षेप घेत साखर, गहू यासारख्या गोष्टी आयात करण्यासाठी नकार दिला होता. २०१८ मध्ये जागतिक बॅंकेकडून जाहीर झालेल्या एका अहवालानुसार जर भारत पाकिस्तानात व्हिजा धोरण, उच्च दर आणि कठीण प्रक्रियांचा फेरा उद्योगांसाठी कमी झाला, तर नक्कीच भारत आणि पाकिस्तानात व्यापारात वाढ होऊ शकते. त्यामुळेच भारत आणि पाकिस्तानात व्यापार २ अरब डॉलर्सने वाढून ३७ अरब डॉलर्स होऊ शकतो असा अंदाज मांडण्यात आला आहे.


हेही वाचा – Sonam Kapoorच्या पतीच्या कपड्यांच्या ब्रँडचे फोटोशूट पाकिस्तानच्या गल्ल्यांमध्ये, पाहा व्हायरल फोटो


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -